AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा मोठा इशारा, पुढील 24 तास धोक्याची, थेट..

Maharashtra Weather Update : राज्यात मुसळधार पावसाला सुरूवात झाली. गेल्या काही दिवसांपासून लोक पावसाची वाट पाहत होते. अखेर पावसाला सुरूवात झाली. राज्यात मुसळधार पाऊस सर्वदूरपर्यंत सुरू आहे

राज्यात मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा मोठा इशारा, पुढील 24 तास धोक्याची, थेट..
Maharashtra Weather Update
| Updated on: Sep 13, 2026 | 9:36 AM
Share

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यात पुन्हा एकदा पाऊस परतला आहे. काल रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरूवात झाली. मुंबईसह उपनगरांमध्ये पाऊस सुरू आहे. नंदुरबार, धुळे नाशिक परिसरात घटमाथ्यायवर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. उत्तर कोकण आणि उत्तर मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला. भारतीय हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला. राजगढ, बेतूल येथे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. अरबी समुद्रात 3.1 ते 7.6 किलोमीटर उंचीवर चकाकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली. कर्नाटकपासून मन्नारपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. मुंबई, ठाणे, पालघर, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, घाटनाथा, रत्नागिरी, अहिल्यानगर, पुणे, बीड, सातारा, अकोला, परभणी, हिंगोली, अमरावती या जिल्ह्यामध्ये भारतीय हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला.

रात्रभर अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळताना दिसला. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. समुद्र सपाटीपासून 7.6 किलोमीटर वेगाने चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली. राज्यात पुढील काही दिवस पाऊस राहण्याची शक्यता आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली. शेतकरी चिंतेत आहे.

त्यातच गणपतीच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर आता राज्यात पावसाला सुरूवात झाली. सर्वदूर पाऊस कोसळताना दिसत आहे. हा मोठा दिलासा हे. मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे. जळगाव शहरासह जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी. जळगाव जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 16.5 मिमी पाऊस झाला. जिल्ह्यात तब्बल महिनाभराच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावली.

पावसामुळे शेतांमध्ये माना टाकलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. गेल्या 24 तासांपासून झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील तापमानात देखील घट झाली. नागपूरसह विदर्भातील यवतमाळ, गोंदिया, गडचिरोली, वाशीम , बुलढाणा वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. नागपूर वेध शाळेने हा येलो अलर्ट जाहीर केला. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची काही चिंता मिटल्याचे पाहायला मिळत आहे.

भंडारा जिल्ह्यात काल दुपारपासून सुरू असलेली पावसाची संततधार आज दुसऱ्या दिवशीही कायम असून, हवामान विभागाने जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी केला आहे. रात्रभर जिल्ह्यातील अनेक भागांत मुसळधार ते रिमझिम पाऊस झाला असून सध्या काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर अनेक भागात पावसाची रिपरिप सुरू आहे. ​भंडारा, लाखांदूर, पवनी, लाखनी, साकोली, मोहाडी आणि तुमसर या सातही तालुक्यांत पावसाने हजेरी लावली आहे.

Follow Us
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
Raj Thackeray : तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना मोठं आवाहन
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदी...
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदींची पोस्ट चर्चेत!
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले…
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं काय घडलं?
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान
ठाण्याची अवस्था बीडपेक्षाही वाईट! अविनाश जाधवांचा सरकारला इशारा, लव
ठाण्याची अवस्था बीडपेक्षाही वाईट! अविनाश जाधवांचा सरकारला इशारा, लवकरच आंदोलनाचा इशारा