AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar : राज्यात अतिवृष्टीने कहर, पिकं पाण्याखाली, शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..

महाराष्ट्रात नवरात्रीच्या सुरुवातीलाच मुसळधार पावसामुळे पुराची भीषण स्थिती निर्माण झाली आहे. शरद पवार यांनी या संकटावर चिंता व्यक्त केली असून, वेगाने पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीची मदत पुरवण्याची गरज अधोरेखित केली आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या व्यापक नुकसानीचा आढावा घेण्यात येत असून, सरकारकडून मदत योजना राबवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई करण्याची मागणी केली जात आहे.

Sharad Pawar : राज्यात अतिवृष्टीने कहर, पिकं पाण्याखाली, शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..
शरद पवार
| Updated on: Sep 23, 2025 | 10:42 AM
Share

नवरात्र सुरू झाली तरीही पावसाने विश्रांती घेतली नसून राज्यात ठिकठिकाणी पावसाचा कहर दिसत आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाने पुन्हा झोडपायला सुरूवात केली असून काही भागांत पूरही आला आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून बऱ्याच भागांत पाणी साठलं आहे, पिकं पाण्याखाली गेली आहेत, लोकं अडकून पडली आहेत. शेतकऱ्यांनाही मोठं नुकसान सहन करावं लागत आहे. ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पावसाचा आढावा घेत एकंदर या परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली आहे.

यंदाच्या वर्षी महाराष्ट्रात अभूतपूर्व पाऊस पडलाय.राज्यात अतिवृष्टी झाली, त्याचा प्रचंड परिणा शेतीवर, गुराढोरांवर आणि शेतकऱ्याच्या संसारावर झालेला आहेय दुष्काळासाठी प्रसिद्ध असणाऱ्या जिल्ह्यात अतिवृष्टी झाली, त्याचा प्रचंड मोठा परिणाम शेतकऱ्यांवर झालाय. सोयाबीनच भरवश्याचं पीक आहे, मात्र पाण्यामुळे सोयाबीनची पीक कुजून गेली, त्याच्यापासूनचं जे उत्पादन होतं शेतकऱ्याच्या हातात नाही, त्यामुळे शेतकरी उधवस्त झाले. मी दुष्काळ पाहिला मात्र अशी अतिवृष्टी मी यापूर्वी कधीही पाहिली नाही असे शरद पवार म्हणाले.

वेगाने पंचनामे करून नुकसान भरपाई देणं गरजेचं 

ही अतिवृष्टी ज्या जिल्ह्यात कामी पाऊस असतो त्या जिल्ह्यात पाऊस पडतोय. सोलापूर, लातूर, धाराशिव, जालना, औरंगाबाद परभणी नगर या सगळ्या भागात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्याच अतोनात नुकसान झाले आहे. असं संकट जेव्हा येतं तेव्हा त्यांना मदत करण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारची असते. आणि नैसर्गिक आपत्ति असेल तर त्याला सहाय्य करण्याची योजना केंद्र सरकारमध्ये आहे. त्या योजनेची राज्यामार्फेत अंमलबजावणी केली जाते. राज्याने अतिशय वेगाने पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देण गरजेचं आहे असं शरद पवार म्हणाले.

शेतकरी राजा, पुन्हा एकदा कसा उभा करायचा याचा प्रयत्न केला पाहिजे.

जमिनी वरील माती वाहून गेली तर कायच नुकसान होत त्यामुळे पीक गेलं म्हणून चालणार नाही, पिकांसोबत जमीन आणि पाणंद रस्ते यांचे पंचनामे करावे लागतील. गुरं देखील वाहून गेली आहेत यांचे पंचनामे गतीने करावे लागतील. शेतकऱ्याला विश्वासात घेऊन तातडीची आणि कायमस्वरूपीची मदत शेतकऱ्यांना देण आवश्यक आहे. राज्य आणि केंद्र सरकारने नैसर्गिक आपत्तीमध्ये साहाय्य करण्याची योजना आहे. शेतकरी राजा, पुन्हा एकदा कसा उभा करायचा याचा प्रयत्न केला पाहिजे. हवामान खात्याने सांगितलं पुढील 4 दिवस पाऊस आहे , पहिल्यांदा असं घडतेय हवामान खाते जे जे सांगतेय ते ते होतंय, असंही त्यानी नमूदल केलं.

हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.