AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोलापुरातील हिंगणी प्रकल्प ओव्हर फ्लो,  भोगावती नदीला पूर

शनिवार पासून सुरू असलेल्या पावसामुळे सोलापुरातील हिंगणी प्रकल्प ओव्हर फ्लो झाला आहे. भोगावती नदीला पूर आल्यानं रस्ते पाण्याखाली जाऊन वाहतूक विस्कळीत झाली.

सोलापुरातील हिंगणी प्रकल्प ओव्हर फ्लो,  भोगावती नदीला पूर
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Oct 12, 2020 | 12:47 PM
Share

सोलापूर: जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे बार्शी तालुक्यातील सर्वात मोठा मध्यम प्रकल्प हिंगणी शंभर टक्के भरला आहे. प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्यानं भोगावती नदीला पूर आला आहे. हिंगणी प्रकल्प भरल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. अनेक भागात पावसामुळे ओढे-नाले भरून वाहू लागले आहेत  (Hingani Project overflow and Bhogavati river flooded in Barshi taluka of Solapur)

चित्रा नक्षत्रात पडलेल्या परतीच्या पावसामुळे वैराग भागातील हिंगणी धरण शंभर टक्के भरले. यामुळे वैराग शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. ढाळे पिंपळगाव, जवळगाव हे मोठे प्रकल्प भरले तरी हिंगणी धरण भरले नव्हते. मात्र, आता हिंगणी धरण भरल्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांतूनही समाधान व्यक्त केले जात आहे. हिंगणी प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याने भोगावती नदीला पूर आला आहे.यामुळे पिंपर,हिंगणी गावचा संपर्क तुटला आहे. भोगावतीला पूर आल्यानं रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेले होते. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.

दरम्यान, खरिप हंगामातील पिकांची काढणी सुरू असताना पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांना फटका बसला आहे. सोयाबीन सह फळबागांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोलापूरमध्ये तीन दिवसांपासून पाऊस हजेरी लावत आहे.

शनिवार पासून सुरू असलेल्या पावसाने पंढरपूर मंगळवेढा, माळशिरस, माढा या तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पंढरपूर शहरात सर्वाधिक 75 मिलीमीटर एवढा पाऊस झाला आहे. अनेक भागात पावसामुळे ओढे-नाले भरून वाहू लागले आहेत

संबंधित बातम्या:

Maharashtra Rain | मुंबई-पुणे ते औरंगाबाद, सोलापूर-कोल्हापूरपर्यंत जोरदार पाऊस

मुंबईसह 16 जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस, हवामान विभागाचा अंदाज

(Hingani Project overflow and Bhogavati river flooded in Barshi taluka of Solapur)

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...