गावबंदी केल्यास शिक्षा काय? छगन भुजबळ यांनी एकाच दगडात मारले दोन पक्षी

OBC Elgar chhagan bhujbal | हिंगोली येथील एल्गर सभेतून ओबीसी नेते आणि राज्यातील मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्याच सरकावर हल्ला केला. त्याचवेळी मनोज जरांगे पाटील यांनाही घेरले. सरकार गावबंदी करणाऱ्यांवर कारवाई करणार आहे की नाही? घटनेनुसार कारवाई होणार आहे की नाही, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.

गावबंदी केल्यास शिक्षा काय? छगन भुजबळ यांनी एकाच दगडात मारले दोन पक्षी
छगन भुजबळImage Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 26, 2023 | 4:11 PM

हिंगोली, दि. 26 नोव्हेंबर 2023 | भारतीय राज्यघटनेने सर्वांना देशात सर्वत्र फिरण्याचा अधिकार दिला आहे. बोलण्याचा अधिकार आणि स्वातंत्र दिले आहे. यामुळे कोणाला गावबंदी करता येऊ शकत नाही. गावबंदी केली तर एका महिन्याची शिक्षा करण्याची तरतूद आहे. ज्यांनी गावबंदीचे बोर्ड लावले त्यांना एका महिन्याच्या शिक्षा करा. आता सरकार कायद्याप्रमाणे कारवाई करणार आहे की नाही? पोलीस हे करणार आहे की नाही? राज्यात सर्वत्र लावलेले गावबंदीचे बोर्ड काढा. पोलिसांनी राज्यघटनेप्रमाणे कारवाई करावी, असा हल्लाबोल ओबीसी नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ आपल्याच सरकारवर केला. तसेच राजेश टोपे, रोहित पवार यांचे तुम्ही स्वागत करतात. त्यांच्यासाठी गावबंदी नाही, परंतु आमच्या नेत्यांना गावबंदी केली जात आहे, अशी खरमरीत टीका मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर केली.

बीडमध्ये आश्रू पुसण्यास कोणी गेले नाही

बीडमध्ये घर जळाली. हॉटेल जळाले गेले. परंतु त्यांचे आश्रू पुसण्यास कोणी गेले नाही. बीड त्यांनीच पेटवले, असा आरोप छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांचे नाव न घेता केले. राज्याच्या मंत्रालयात आयएएस, आयपीएस अधिकारी मोठ्या संख्येने मराठा समाजाचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या १० टक्के सुवर्ण आरक्षाचा फायदा ८५ टक्के मराठ्यांना होत आहे. त्यानंतरही ओबीसींना बाजूला करुन सर्व आरक्षण मराठ्यांना देण्याचा प्रयत्न सुरु आहे.आमदार नारायण कुचे, भास्कर पाटील, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना गावबंदी करणार आणि राजेश टोपे आले, रोहित पवार आले त्यांचे स्वागत करणार? असा प्रश्न भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना विचारला.

हे सुद्धा वाचा

एकदाची जातीय जनगणना कराच

राहुल गांधी जातीय जनगणनेची मागणी करत आहे. इतर पक्षातूनही ही मागणी पुढे येत आहे. मग एकादाची जातीय जनगणना करा आणि ‘दूध का दूध पानी का पानी’ होऊन जाऊ द्या. मग समजणार कोण मागास आहे. बिहार करु शकतो तर महाराष्ट्र का करु शकत नाही. जनगणनेत जे येईल, ते मान्य करायला आम्ही तयार आहोत, असे भुजबळ यांनी म्हटले.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.