AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर खासदार नागेश पाटील यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, अतिरेक झाला..

हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी बंडखोरी केली. शिवसेना ठाकरे गटातून त्यांनी फारकत घेतली. यादरम्यान दोन ते तीन दिवसांनंतर ते पहिल्यांदाच कॅमेऱ्याच्या पुढे आले. त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर खासदार नागेश पाटील यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, अतिरेक झाला..
Nagesh Patil Ashtika
| Updated on: Jun 21, 2026 | 2:20 PM
Share

बंडखोर खासदार संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर आणि संजय देशमुख हे तिघेही मतदार संघात जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. यादरम्यानच आता बंडखोरीनंतर हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. त्यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी म्हटले की, मी आज दोन तीन दिवसांनंतर आपल्यासमोर पहिली पोस्ट शेअर करत आहे. बऱ्याचदिवसापासून वेगवेगळ्या चर्चांना उधाण येत आहे. मी पहिल्यांदा तर सांगतो की, मी कोणावरही नाराज वगैरे होऊन गेलेलो नाहीये. उद्धव ठाकरे यांच्यावर तर अजिबात नाराज नाहीये. त्यांनी मला खूप प्रेम दिले, याबाबत दुमत नाहीये. संजय राऊत वगैरे कोणी ही मोठी मंडळी बोलत असेल तर तो त्यांचा हक्क आहे, त्यांनीही माझ्यावर प्रेम केले आहे, ते बोलतील, ते काही अडचणीचे नाही.

माझ्या वडिलांप्रमाणे ते आहेत, ते बोलले तरीही मला त्याच्यावर वाईट वाटणार नाही. पण हे सर्व करत असताना आम्ही 18 तारखेपर्यंत तरी कोणी कुठेच गेलो नव्हतो. पण ज्यापद्धतीचा अविश्वास किंवा बोलण्याचा अतिरेक झाला, त्यानतंर बऱ्याच मंडळींनी विचार केला की, आता तिथे थांबून फार उपयोग होणार नाही. खरं सांगायचे झाले तर आपल्या सर्वांना माहिती आहे की, खूप दिवसांपासून आपण पाहतोय की, सत्तेशिवाय कुठलीही कामे होत नाहीत. त्यामुळे कदाचित मी या सर्व गोष्टींचे पाऊस उचलले, त्यामागील हे मोठे कारण असू शकते.

माझ्या मतदार संघात विकासकामे करावी लागतील. लोकांनी मला खूप मोठ्या आशेने निवडून दिले आहे. मला त्यांची कामे करणे कर्मप्राप्त आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की, कोणत्याही प्रकारचा निधी आपल्याला मिळत नाही. जे 5 कोटी मिळतात, ते अतिशय अपुरे आहेत. प्रत्येकाला काही ना काही अपेक्षा आहेत. प्रत्येकाने मला काही ना काही आशेने निवडून दिले. मी ही कामे कशी करायची आणि निधी कुठून मिळवायचा ? लोकांची जी कोणती कामे आहेत, ती होत नव्हती. सर्वांना माहिती आहे की, सत्तेशिवाय करता येत नव्हते.

त्यामुळे हे पाऊल उचलले असेल, बऱ्याच जणांना पटले असेल नसेल. जनता जनार्धन आहे, प्रत्येका तालुक्याने माझ्यावर खूप जास्त प्रेम केले. खूप मोठ्या आशेने निवडून दिले आहे. मी दोन वर्षापासून प्रयत्न करत आहे. पुढेही करत राहिल,मी आपल्याचसोबत आहे. पण मला काम करायचे असेल निधी जर आणायचा असेल तर सत्तेत जाण कर्मप्राप्त आहे. बंडखोरीनंतर पहिल्यांदाच आपल्या मनातील भावना व्यक्त करताना नागेश पाटील आष्टीकर दिसले.

Follow Us
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार
Pune : लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
Video: पुण्यात 28 तासांपासून तुफान गर्दी, डान्स अन् गाणं सुरूच...लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह