Santosh Bangar यांचा प्रकाश आंबेडकरांवर घणाघात, गेल्या निवडणुकीत पैसे घेतल्याचा आरोप

| Updated on: Mar 25, 2022 | 3:30 PM

संतोष बांगर म्हणाले, भाजप मतं विभाजित करते. त्यासाठीच त्यांनी एमआयएमला पुढं केलं असणार. गेल्या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितचा त्यासाठीच वापर केला गेला होता. त्यासाठी एक हजार कोटी रुपये दिले गेले होते, असा गौप्यस्फोट बांगर यांनी केला.

Santosh Bangar यांचा प्रकाश आंबेडकरांवर घणाघात, गेल्या निवडणुकीत पैसे घेतल्याचा आरोप
हिंगोलीचे शिवसेना जिल्हाप्रमुख मेळाव्यात प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका करताना.
Image Credit source: tv 9
Follow us on

हिंगोली : गेल्या निवडणुकीत वंचितचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी एक हजार कोटी रुपये घेतल्याचा आरोप हिंगोलीचे शिवसेना जिल्हाप्रमुख व आमदार संतोष बांगर यांनी केला. हिंगोलीत शिवसेनेचं शिवसंपर्क अभियान (Shiv Sampark Abhiyan) सुरू आहे. यानिमित्त जवळा बाजार येथे झालेल्या मेळाव्यात त्यांनी हा आरोप केला. वंचितही टीम ही भाजपची बी टीम असल्याचंही त्यांनी म्हटलं. या मेळाव्याच्या भाषणात शिवसेनेचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी एमआयएमच्या महाविकास आघाडीच्या प्रस्तावावरून प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली. प्रकाश आंबडेकर यांना एक हजार कोटी रुपये दिले. त्यांनी हेलिकॉप्टरनं प्रचारसभा घेतल्या. असं म्हणत शिवसेनेचे संतोष बांगर यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली.

आंबेडकरांचे हात कशासाठी मजबूत करायचं

प्रकाश आंबेडकरांनी गेल्या निवडणुकीत एक हजार रुपये कोटी रुपये घेतले. पण, कुणाकडून ते मात्र बांगर यांनी स्पष्ट केलं नाही. संतोष बांगर म्हणाले, भाजप मतं विभाजित करते. त्यासाठीच त्यांनी एमआयएमला पुढं केलं असणार. गेल्या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितचा त्यासाठीच वापर केला गेला होता. त्यासाठी एक हजार कोटी रुपये दिले गेले होते, असा गौप्यस्फोट बांगर यांनी केला. त्यावेळी प्रकाश आंबेडकर याचे हात मजबूत करायचं आहेत, असं म्हटलं जात होतं.

वंचित ही भाजपची दुसरी टीम

प्रकाश आंबेडकर यांना आपल्या बौद्ध समाजाला ताकद दाखवायची म्हणाले. ते कुणाच्या भरोशावर असा प्रश्नही बांगर यांनी उपस्थित केला. एमआयएमनं महाविकास आघाडीत समाविष्ट होण्याचा प्रस्ताव दिला होता. महाविकास आघाडीमध्ये समावेश करून घ्या. एमआयएमं ही भाजपची बी टीम आहे. वंचितसुद्धा भाजपचीच टीम आहे. त्यामुळं एमआयएमला महाविकास आघाडीत सहभागी करून घेण्याचे कारण काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Video Nagpur | विदर्भातून शिवसेनेला मंत्रीमंडळात प्रतिनिधीत्त्व मिळणार? शिवसंपर्क अभियानानंतर मुंबईत हालचाली वाढल्या

Nandurbar Accident | कंटेनर-आर्टिका गाडीचा भीषण अपघात, तीन जण ठार, रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाचा मृत्यू

Nagpur Railways | रेल्वेत आधी मैत्री करून drinks ऑफर करायचा, नंतर गुंगीचे औषध देऊन चोरी करायचा, पोलिसांनी ठोकल्या बेड्या