वेदांता केव्हा गेला याची तारीखचं सत्तार यांनी सांगितली, नेत्यांवर अशी केली टिपण्णी

राजकारणावर बोलणे सोपे आहे. तरुणांचे माथे भडकवण्याचे काम चालू आहे.

वेदांता केव्हा गेला याची तारीखचं सत्तार यांनी सांगितली, नेत्यांवर अशी केली टिपण्णी
अब्दुल सत्तारImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Oct 28, 2022 | 7:35 PM

हिंगोली : 21 सप्टेंबर 2021 वेदांता हा प्रोजेक्ट गुजरातला गेला. त्यावेळी उद्योगमंत्री कोण होते. सुभाष देसाई आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री. सुभाष देसाई कसे करायचे. याची नक्कल अब्दुल सत्तार यांनी करून दाखविली. कसं करायला पाहिजे. हेही त्यांनी सांगितलं. मी मुसलमान असून नमस्कार कसा घेतो, याचं प्रात्यक्षिक त्यांनी करून दाखविलं. छोटा पप्पू म्हणून आदित्य ठाकरे यांचा उल्लेख केला. हे पाप 2021 म्हणजे उद्धव ठाकरेंच्या काळातील आहे. तुम्ही अडीच वर्षात आमदार सांभाळू शकले नाहीत. प्रोजेक्ट बाहेर का गेले, याची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

12 -1 वाजेपर्यंत लोक रस्त्यावर येऊन शिंदेंना भेटतात. 7-12 वर भूविकास बँकेचे कर्ज होते ते क्लिअर केले. 25 वर्षात जुलै, ऑगस्टचे नुकसानभरपाई सप्टेंबरमध्ये शेतकऱ्यांना भेटली आहे. अब्दुल सत्तार यांनी सांगितलं की, बीडच्या दौऱ्यातील तो व्हिडिओ आहे. चहाच्या पिण्याच्या गप्पांवरून चुकीचे अर्थ काढत आहेत. ढगफुटी संदर्भात दौरे करत होतो. पंचनामे काही दिवसात पूर्ण होतील. शेतकऱ्यांना मदत मिळेल.

अब्दुल सत्तार म्हणाले, नोटांचे राजकारण हा काही मोठा विषय नाही. महापुरुषांच्या नावाने नोटा येणे त्यात काही वाईट नाही. एखाद्या व्यक्तीचे वक्तव्य टाकून चुकीचे राजकारण चालू आहे. छोटा पप्पू काय म्हणतो त्याला काही अर्थ आहे का?, त्यांनी बांध वडिलांना जाऊन विचारावा. स्वतःचा बाण टिकवला नाही.

56 चे 15 आमदार राहिले आहेत. अडीच तासाच्या दौऱ्यापैकी अर्धा तास पाहणी केली. 20 मिनिटांच्या पाहणीत उद्धव ठाकरेंना काय समजले असणार, असा सवाल अब्दुल सत्तार यांनी उपस्थित केला.

राजकारणावर बोलणे सोपे आहे. तरुणांचे माथे भडकवण्याचे काम चालू आहे. रवी राणा – बच्चू कडू यांच्यातील वाद मुखमंत्री-उपमुख्यमंत्री मिटवतील, अशी अपेक्षा अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केली. मुंबई महापालिका युतीच्या ताब्यात येतील. शिंदे – फडणवीस यांच्या ताब्यात जर महापालिका आली तर मुंबईचा कायापालट होईल, अस मतं त्यांनी व्यक्त केलं.

पावसामुळे नुकसान होते. पण 234 कोटी रुपये हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आपण दिले आहेत. आमचे सरकार कमी पडू देणार नाही. शेतकऱ्यांच्या खात्यात आमच्यामुळं लवकर पैसे आले. आमचे गतिमान सरकार आहे. महाराष्ट्रातील सरकार शेतकऱ्याला सर्वतोपरी मदत देणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
महाराष्ट्रातील नरेंद्र मोदींच्या सभांच्या झंझावातावर विरोधकांचा निशाणा
महाराष्ट्रातील नरेंद्र मोदींच्या सभांच्या झंझावातावर विरोधकांचा निशाणा.
महायुतीत मुंबईत 2 जागांवर सस्पेन्स, 'या' उमेदवारांची चर्चा, कधी घोषणा?
महायुतीत मुंबईत 2 जागांवर सस्पेन्स, 'या' उमेदवारांची चर्चा, कधी घोषणा?.
जप्तीनंतर भेट; लवकरच शरद पवार गटाच्या अभिजीत पाटलांचा भाजपात प्रवेश?
जप्तीनंतर भेट; लवकरच शरद पवार गटाच्या अभिजीत पाटलांचा भाजपात प्रवेश?.
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.