AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवारांनी झापलेल्या त्या सरपंचाने व्यक्त केली खदखद, म्हणाला दादा आयटीयन्सना कुठं पण भेटतात पण…!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हिंजवडी आयटी पार्क भेटीनंतर सरपंच गणेश जांभुळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पवारांनी विकासातील अडचणींबद्दल खडेबोल सुनावले होते. जांभुळकर यांनी अडचणींची कारणे स्पष्ट केली आणि MIDC च्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.

अजित पवारांनी झापलेल्या त्या सरपंचाने व्यक्त केली खदखद, म्हणाला दादा आयटीयन्सना कुठं पण भेटतात पण...!
ajit pawar hinjwadi
| Updated on: Aug 01, 2025 | 12:03 PM
Share

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी पुण्यातील हिंजवडीमधील राजीव गांधी आयटी पार्क परिसराचा दौरा केला होता. यावेळी अजित पवारांनी हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकर यांनी सुनावले होते. अहो असू द्या हो असू द्या हो साहेब, धरण करताना मंदिर जातातच की नाही. तुम्हाला सांगायचं ते सांगा मी ऐकून घेतो, पण मी काय करायचं तेच करतो…आपलं वाटोळं झालंय, हिंजवडीचं सगळं आयटी पार्क बाहेर चाललाय…माझ्या पुण्यातून महाराष्ट्रातून बाहेर….बेंगलोरला हैदराबादला …काय तुम्हाला पडलं नाही….कशाला मी सहा वाजता पाहणी करायला येतो इथं, मला कळत नाही माझी माणसं नाहीत…हे केल्याशिवाय गत्यंतर नाही, असे म्हणत अजित पवारांनी चांगलेच खडेबोल सुनावले. यावर आता हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दादांना वेगळं वाटल्यामुळे दादा बोलले

हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकर यांनी नुकतंच टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. यावर त्यांनी भाष्य केले आहे. खडेबोल वैगरे नाही, दादा पाहणी दरम्यान ज्या अडचणी समोर येत होत्या. पीएमआरडी, एमआयडीसी, PWD अंतर्गत सगळे रस्त्यात येतात, ह्यात चुकी सगळी त्यांची, त्या चुकीसंदर्भात दादांना बोलायला गेलो, त्यावेळी आमच्या गावाचा रस्ता, मंदिर, ग्रामपंचायत या संदर्भात बोलायला गेलो होतो. त्याचा विचार व्हावा, गेल्या 50 वर्षांपासून लोक राहतात ते अचानक कसे काढणार, अनेक अतिक्रमण आहेत ती काढली गेली नाही हे सांगायला गेलो. ते दादांनी ऐकून घेतलं नाही आणि शेवटी दादा उपमुख्यमंत्री आहेत. मी माझ्या गावच्या समस्या मांडायला गेलो होतो तर दादांना वेगळं वाटल्यामुळे दादा बोलले, असे गणेश जांभुळकर यांनी म्हटले.

आधी MIDC चा टॅक्स पूर्वी आम्हाला मिळत होता, गेली 7 वर्ष झाले अर्धा टॅक्स MIDC घेते, त्या टॅक्स चा उपयोग MIDC करत होती. हिंजवडी, माण,मारूजी या तीन ग्रामपंचायती मिळून अर्धा टॅक्स Midc घेत, आमच्याकडून टॅक्स घेऊन पण विकास करत नाही. MIDC मुळे हिंजवडी मधील सगळे प्रश्न उद्भवले. बस पाण्यातून जाणं, खड्डे, पाणी साठणं ही MIDC ची चूक आहे, आमच्या तीनही ग्रामपंचायतीची चूक नाही, ह्यात आयटी अभियंताना काही माहिती नसतं, कुठल्या पेपरला बातमी आली की तीच लावून धरतात आणि ग्रामपंचायतीवर खापर फोडतात. ह्यात आमची काहीच चूक नाही, असे स्पष्टीकरण गणेश जांभूळकर यांनी दिले.

आमची शेती, जागा गेल्या काहीच पेसे दिले नाही

आम्ही ग्रामस्थ अजित पवारांची वेळ मागत आहे. मात्र अजित पवार आयटीयन्सना कुठं पण रस्त्यात भेटतात आणि समस्या जाणून घेतात, दादांनी समस्या कुणामुळे झाल्या हे जाणून घेतल पाहिजे. त्यांचा खोलापर्यंत गेलं पाहिजे त्या ग्रामपंचायतीची काय चूक आहे, त्यामुळे आम्ही दादाना सांगतो आहे. आम्हाला वेळ द्या, मागच्या बैठकीला आम्ही बळजबरीने आत गेलो, मात्र आम्हाला बाहेर काढून दिलं, सगळ्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे, आम्हाला एक वेळ द्या, ती मुंबईला द्या किंवा अन्य ठिकाणी द्या, आम्ही जायला तयार आहोत, जेणेकरून आमच्या समस्यांना न्याय मिळेल. अनेक मंदिर, शाळा, ग्रामपंचायत कार्यालय, स्मशानभूमी, दशक्रिया घाट जी लोक 50 वर्षांपासून लोक राहतात, ते रस्त्यात जात आहे. जिल्हा परिषद शाळेत 2500 मुले शिकत आहेत ती कुठं बसणार…, आयटी अभियंते सगळे बाहेरून येतात आणि ते दादाच्या कानात सांगतात. रस्ते असे झाले पाहिजे, आमची शेती, जागा गेल्या काहीच पेसे दिले नाही. मान ची 3 हजार एकरची जागा आरक्षित केली एक पैसा पण दिला नाही, असा आरोपही गणेश जांभूळकर यांनी केला आहे.

7 गावची एक नगरपालिका करा

आम्हला महानगरपालिकेत समाविष्ट नका करू. आमच्या तीन गावासह सात गावाची स्वतंत्र नगरपालिका करा किंवा ग्रामपंचायत ठेवा जी ग्रामस्थांची मागणी आहे तीच सरपंच म्हणून माझी मागणी आहे, हिंजवडी शेजारची गाव गेली 15 वर्ष झाली अजून सुविधा नाही, त्यांचे रस्ते बघा काय अवस्था आहे, रस्ते खराब वाहतूक कोंडी आहे. मी हजार वेळा पत्रव्यवहार केला, एमआयडीसीला दुरुस्ती करा मात्र लक्ष देत नाही. पालिकेत जाऊन उपयोग नाही आम्ही सक्षम आहोत. 7 गावची एक नगरपालिका करा ही आमची इच्छा आहे, असे गणेश जांभूळकर यांनी म्हटले.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.