AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

होळकर कुटुंबीयांनी त्या काळी दिलेली जागा आता परत करणार; शरद पवार यांचे अश्वासन; रयतकडून शाळेसाठी 1 कोटी देणार

मुलामुलींचे शिक्षण चांगले व्हावे यासाठी वाफगाव येथील आपली जागा व वाडा होळकर कुटुंबीयांनी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांना 1950 साली देण्यात आली होती. त्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून तिथे रयत शिक्षण संस्थेची म. य होळकर विद्यालय ही शाळा सुरू आहे.

होळकर कुटुंबीयांनी त्या काळी दिलेली जागा आता परत करणार; शरद पवार यांचे अश्वासन; रयतकडून शाळेसाठी 1 कोटी देणार
होळकर कुटुंबीयांनी त्या काळी दिलेली जागा आता परत करणार;शरद पवार यांचे अश्वासनImage Credit source: tv9 marathi
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Jun 12, 2022 | 3:49 PM
Share

पुणेः जामखेड तालुक्यातील चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर जयंती (Ahilya Devi Holkar Jayanti) कार्यक्रमप्रसंगी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांना वाफगाव किल्ल्याचे संवर्धन करण्याची गरज असल्याचे सांगितले. त्यानंतर या किल्ल्याची पाहणी करण्याची विनंतीही त्यांनी केली होती. आमदार रोहित पवार यांची ही विनंती मान्य करून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी या किल्ल्याची पाहणी केली. होळकर कुटुंबीयांनी त्या काळी दिलेली जागा आता परत त्यांच्या कुटुंबियांना देणार असल्याची ग्वाही रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी दिली.

श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या वाफगाव येथील किल्ल्याची पाहणी करण्यासाठी शरद पवार, होळकर कुटुंबीयांतील भूषण सिंह राजे होळकर व आमदार रोहित पवार वाफगावला गेले होते. यावेळी रोहित पवार यांनी वाफगाव किल्ल्याचे संवर्धन करण्याची गरज आहे असं सांगितले होते.

मुलामुलींच्या शिक्षणासाठी जागा

परिसरातील मुलामुलींचे शिक्षण चांगले व्हावे यासाठी वाफगाव येथील आपली जागा व वाडा होळकर कुटुंबीयांनी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांना 1950 साली देण्यात आली होती. त्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून तिथे रयत शिक्षण संस्थेची म. य होळकर विद्यालय ही शाळा सुरू आहे. होळकर कुटुंबीयांनी त्या काळी दिलेली जागा आता परत त्यांच्या कुटुंबियांना परत देणार असल्याचे अश्वासन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहे.

शाळेसाठी 3 कोटी देणार

या कार्यक्रमाला उपस्थित असणारे ग्रामस्थ व स्थानिक आमदार यांनी शरद पवार यांना विनंती करुन सांगण्यात आले आहे की, मुला-मुलींचे शिक्षण महत्त्वाचे आहे त्यामुळे परिसरातील भागात जागा पाहून त्या ठिकाणी नवीन शाळेच्या इमारतीची उभारणी करू. ग्रामस्थांनी देखील जागा देण्यासाठी पुढाकार घ्यावा असे यावेळी त्यांनी आवाहन केले. 3 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी नवीन शाळा उभारली जाणार असून त्यातील १ कोटी रुपये रयत शिक्षण संस्थेच्यावतीने देण्यात येतील, अशी घोषणाही शरद पवार यांनी यावेळी केली.

शाळा लवकरच पूर्ण करणार

उर्वरित २ कोटी रुपयांमध्ये स्थानिक ग्रामस्थ स्थानिक आमदार दिलीप मोहिते व या कार्यक्रमाला उपस्थित असलेले कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीही वाटा उचलण्याची तयारी दर्शवली असून ही शाळा लवकरच पूर्ण करण्याचे अश्वासनही यावेळी देण्यात आले आहे.

यावेळी शरद पवार यांनी सांगितले की, वाफगावचा वाडा हा लवकरात लवकर होळकर कुटुंबीयांना परत दिला जाईल अथवा जर त्यांनी सांगितले तर तो सरकारलादेखील देण्यात येईल असे सांगितले. त्यावेळी त्यांनी त्या ठिकाणी विकास आराखडा बनवून सरकारच्या मदतीने निधीदेखील उपलब्ध केला जाऊ शकतो असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

Follow Us
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही; १५ ऑगस्ट डेडलाईन
प्रताप सरनाईक: अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही, १५ ऑगस्ट अंतिम तारीख
धीरज परदेशी हत्या प्रकरणात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा जगतापांचा आरोप
धीरज परदेशी हत्या प्रकरण: तपासात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा संग्राम जगतापांचा आरोप
पुण्यातील भोंदू बाबाचा व्हिडिओ व्हायरल: शिष्य पाय धुऊन पाणी पितात
उमेश तागुंदेचा वादग्रस्त व्हिडिओ: शिष्यांकडून पाय धुऊन पाणी पिण्याचा धक्कादायक प्रकार.
बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
Supriya Sule | बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क साधण्याचे दिले निर्देश
राज ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क वाढवण्याचे निर्देश, पुण्यातील बैठकीत स्पष्टीकरण
पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली...
Pune | पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचं शोषण; आरोपी फरार
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल, रोजगार टिकवण्यासाठी उपाययोजनांची मागणी
भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या...
Pune | भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या विस्तारावर हिंदू महासभेचे आनंद दवे आक्रमक