.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vidhan Parishad Election : ही दोस्ती तुटायची नाय…म्हणता…म्हणता, तुझं तू बघ, माझं मी बघतो? विधान परिषदेत शिवसेनेचा सावध पवित्रा

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या संजय राऊत यांचा विजय, तर संजय पवार पराभूत झाले. त्यामुळे संजय पवार यांच्या पराभवाचे खापर संजय राऊत यांनी अपक्षांवर फोडल्याने महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

Vidhan Parishad Election : ही दोस्ती तुटायची नाय...म्हणता...म्हणता, तुझं तू बघ, माझं मी बघतो? विधान परिषदेत शिवसेनेचा सावध पवित्रा
ही दोस्ती तुटायची नाय...म्हणता...म्हणता, तुझं तू बघ, माझं मी बघतो? विधान परिषदेत शिवसेनेचा सावध पवित्राImage Credit source: tv9
दादासाहेब कारंडे
दादासाहेब कारंडे | Updated on: Jun 12, 2022 | 3:37 PM
Share

मुंबई : राज्यसभा निवडणुकीतला (Rajyasabha Election) पराभव हा शिवसेनेच्या (Shivsena) इतका जिव्हारी लागलाय की आता शिवसेनेने विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी (Vidhan Parishad Election) सावध पविक्षा घेतलाय. गेल्या काही वर्षात आमचा फेविकॉलचा जोड आहे, कधीच तुटणार नाही म्हणाऱ्या आघाडीतला  जोड हा आता कुठेतरी सैल होताना दिसत आहे. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेला झालेला दगाफटका पाहता आता विधान परिषद निवडणुकीत आप, आपलं बघा असे सूर निघताना दिसू लागल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. राज्यसभा निवडणुकीतील अनुभवाने दुखावले गेलेल्या शिवसेनेचा महाविकास आघाडीतील मित्र पक्ष काँग्रेस-NCP ला हा सूचक संदेश आहे. मात्र आता शिवसेनेच्या भूमिकेमुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या संजय राऊत यांचा विजय, तर संजय पवार पराभूत झाले. त्यामुळे संजय पवार यांच्या पराभवाचे खापर संजय राऊत यांनी अपक्षांवर फोडल्याने महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

शिवसेना सावध भूमिकेत

आता 20 जूनला होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना सावध झालीय.  10 जागांसाठी होत असलेल्या निवडणूकित महाविकास आघाडीचे 6, भाजपचे 5 आणि भाजप निकटवर्तीय अपक्ष 1 असे एकूण 12 उमेदवार रिंगणात आहेत.  शिवसेनेने 2, राष्ट्रवादी काँग्रेसने 2 आणि काँग्रेसने 2 उमेदवार उभे केले आहेत. आता या निवडणुकीत विजयासाठी 27 मतांचा कोटा शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून येण्यासाठी पक्षाची कट टू कट मतं आहेत. 10 वी जागा निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजपची पुन्हा सर्व भिस्त पुन्हा एकदा अपक्षांवर असणार आहे. त्यात हे मतदान पूर्णपणे गोपनीय असल्याने राज्यसभा निवडणूकीनंतर आता विधान परिषद निवडणुकीत उत्कंठा आणि रंगत वाढली आहे. गोपनीय मतदान असल्याने महाविकास आघाडी आणि भाजप पुन्हा एकदा एकमेकांची मते फोडण्याचा प्रयत्न करताना दिसून येणार आहे.

शिवसेना काँग्रेसची साथ सोडणार?

यावेळी काँग्रेसला आपला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी आणखी 10 मतांची गरज आहे काँग्रेसकडे असलेल्या 44 आमदाऱ्यांच्या ताकदीवर त्यांचा 1 उमेदवार सहज निवडून येईल. 44 मतांतून पहिल्या पसंतीची 27 मते पहिल्या उमेदवाराला गेल्यानंतर पक्षाची 17 मते शिल्लक राहतात. त्यामुळे आता काँग्रेसला इतर मतांची गरज भासणार आहे. मात्र शिवसेने साथ न दिल्यास काँग्रेसच्या उमेदवाराची अडचण होऊ शकते. दुसरीकडे राज्यसभा निवडणुकीत भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून आल्याने भाजपचा आत्मविश्वास द्विगुणीत झालाय. महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांची मते मिळवण्याची भाजपची व्यूहरचना यशस्वी ठरलीय, त्यामुळे आता काँग्रेसच्या गोटातलं टेन्शन वाढलं आहे. त्यातच आता शिवसेनेची ही भूमिका आघाडीसाठी वेगळी ठरणार का? हे येणारे काही दिवसच सांगतील.

Follow Us
सचिन आहिर यांच्यानंतर 'उबाठा'तील सर्वच आमदार... आदित्य ठाकरेंचं नाव
सचिन आहिर यांच्यानंतर 'उबाठा'तील सर्वच आमदार... आदित्य ठाकरेंचं नाव घेत बड्या नेत्याचं खळबळजनक विधान
ऑपरेशन टायगरचा आणखी एक मोठा वार! ठाकरेंचा बडा नेता शिंदेंकडून मैदानात
मोठी बातमी! ऑपरेशन टायगरचा आणखी एक मोठा वार! ठाकरे गटाचा बडा नेता शिंदेंच्या सेनेकडून मैदानात
राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट! ओमराजे निंबाळकरांची फडणवीसांसोबत भेट
राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट! ओमराजे निंबाळकरांची फडणवीसांसोबत भेट; तासभर झालेल्या चर्चेत असं काय घडलं?
रावणानेही दानपेट्या लुटल्या नाहीत, पण रामभक्तांनी...
Sanjay Raut Full Press | रावणानेही दानपेट्या लुटल्या नाहीत, पण रामभक्तांनी...; संजय राऊतांचा भाजपवर जिव्हारी लागणारा वार!
एक गट इकडे म्हणतंय तर दुसरं तिकडे; राष्ट्रवादी शरद पवार गटाचं...
एक गट इकडे म्हणतंय तर दुसरं तिकडे; राष्ट्रवादी शरद पवार गटाचं विलीनीकरण... नेमकं काय घडतंय?
टीईटी पेपरफुटीमधील मुख्य सूत्रधाराच्या पत्नीला पाटणातून अटक
TET Paper Leak |  ठाणे पोलिसांची कारवाई; टीईटी पेपरफुटीमधील मुख्य सूत्रधाराच्या पत्नीला पाटणातून अटक
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली; कोणाला मिळणार उपसभापती पद? बड्या
Vidhan Parishad | शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली; कोणाला मिळणार उपसभापती पद? बड्या नेत्यांची नावे...
शिंदे गटातील दोन प्रमुख नेते मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले...
ब्रेकिंग! शिंदे गटातील दोन प्रमुख नेते मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले; वर्षा बंगल्यावर नेमकं काय शिजलं?
अमरावतीत पावसाचा हाहाकार! मेघा नदीला पूर; चांदूर बाजारातील...
Amravati Rain | अमरावतीत पावसाचा हाहाकार! मेघा नदीला पूर; चांदूर बाजारातील आठवडी बाजारात शिरले पाणी
APMC मार्केटमध्ये पाणीच पाणी, पहाटेपासून मुसळधार पावसाचा कहर
Navi Mumbai Rain | APMC मार्केटमध्ये पाणीच पाणी, पहाटेपासून मुसळधार पावसाचा कहर; वाहतूक विस्कळीत