AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नासाठी निघालेल्या वाहनाचा भीषण अपघात; 3 जणांचा जागीच मृत्यू, 7 जखमी

सगळ्यात धक्कादायक बाबा म्हणजे लग्नासाठी निघालेल्या गाडीचा हा भीषण अपघात घडला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.

लग्नासाठी निघालेल्या वाहनाचा भीषण अपघात; 3 जणांचा जागीच मृत्यू, 7 जखमी
| Edited By: | Updated on: Feb 17, 2021 | 7:48 AM
Share

औरंगाबाद : राज्यात गेल्या काही दिवसांपासून भीषण अपघाताच्या घटना समोर येत आहेत. अशात औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड शहरात आणखी एक काळजाचा ठोका चुकावणारा अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक आणि क्रूझर वाहनात अपघात झाला असून यामध्ये तीन जणांचा मृत्यू तर 7 जण जखमी असल्याची माहिती देण्यात आली आली. सगळ्यात धक्कादायक बाबा म्हणजे लग्नासाठी निघालेल्या गाडीचा हा भीषण अपघात घडला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. (horrific accident with wedding vehicle 3 killed on the spot 7 injured in aurangabad)

मिळालेल्या माहितीनुसार, कन्नड शहरातील चौधरी पेट्रोल पंपाजवळ या दोन्ही वाहनांमध्ये धडक झाली. ही धडक इतकी मोठी होती की यामध्ये 3 जणांचा जागीच मृत्यू झाला असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अपघात होताच घटनास्थळी स्थानिकांनी गर्दी केली असून तात्काळ पोलिसांना आणि रुग्णालयाला पाचारण करण्यात आलं.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत 7 जखमींना तातडीने नजिकच्या स्थानिक रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून तीन जणांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. तर सदर मृतदेहांना शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.

लग्न समारंभासाठी निघालेल्या गाडीवर काळाचा घाला बसल्याने कुटुंबियांमध्ये दुखाचं वातावरण आहे. तर मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात आलं आहे. या अपघाताचा पोलीस तपास करत असून नेमकी धडक कशी झाली आणि दोन्ही वाहनांचा वेग जास्त होता का? याची चौकशी करत आहे. यासाठी पोलीस प्रत्यक्षदर्शींची चौकशी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. (horrific accident with wedding vehicle 3 killed on the spot 7 injured in aurangabad)

संबंधित बातम्या –

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, आई-वडील-बहिणीचा मृत्यू, चिमुकला बचावला

जळगाव ट्रक अपघातात एकाच कुटुंबातील दहा जणांचा मृत्यू, आभोळा गावावर शोककळा

जळगावात पपयांचा ट्रक उलटून भीषण अपघात; 15 मजूर जागीच ठार

‘सावधान इंडिया’च्या आर्ट डारेक्टरसह दोघे अपघातात ठार; 20 तासांची शिफ्ट संपवून घरी जाताना दुर्घटना

(horrific accident with wedding vehicle 3 killed on the spot 7 injured in aurangabad)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.