जळगावात पपयांचा ट्रक उलटून भीषण अपघात; 15 मजूर जागीच ठार

चोपडा रस्त्यावर असणाऱ्या एका वळणावर ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि ट्रक पलटी झाला. | accident

जळगावात पपयांचा ट्रक उलटून भीषण अपघात; 15 मजूर जागीच ठार

जळगाव: जळगावच्या यावल तालुक्यात रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात (Road accident) 15 मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. (Major accident in Jalgaon)

यावल तालुक्यातील किनगाव नजीक हा अपघात घडला. साधारण रात्री एक वाजताच्या सुमारास येथील यावल चोपडा रस्त्यावर असणाऱ्या एका वळणावर ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि ट्रक पलटी झाला. पपई घेऊन हा ट्रक बाजारपेठेकडे चालला होता. ट्रकमध्ये भरलेल्या पपयांच्या वरती मजूर बसले होते. या रस्त्यावर बरेच खड्डे पडले आहेत. त्यामुळे ट्रक उलटा झाल्याचे सांगितले जात आहे.

या घटनेची वर्दी मिळताच जळगाव आणि यावल येथील पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पलटी झालेला ट्रक क्रेनच्या साहाय्याने सरळ करण्यात आला. त्यानंतर मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. तर दोन जखमींवर सध्या नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सुट्टीच्या दिवशी ट्रक आणि बसचा भीषण अपघात, 13 लोकांचा जागीच मृत्यू तर 4 जखमी

आंध्र प्रदेशमध्ये रविवारी सकाळी एक भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये आतापर्यंत 13 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 4 जखमी झाले होते. बस आणि ट्रक यांच्यात धडक झाल्यामुळे हा अपघात झाला. आंध्र प्रदेशातील हा रस्ता अपघात कुर्नूल जिल्ह्यातील मदारपूर गावात झाला. आंध्र प्रदेशात शनिवारीही एक भीषण रस्ते अपघात झाला होता. यामध्ये विशाखापट्टणम जिल्ह्यातील 20 जणांना घेऊन निघालेली बस अराकुजवळील अनंतगिरी इथं खड्ड्यात पडली. यामध्ये चार जण ठार तर 13 जण जखमी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याबद्दल दुःख व्यक्त केलं होतं.

संबंधित बातम्या – 

Video | कोल्हापुरात 50 शेतकऱ्यांचा 60 एकरातील ऊस जळून खाक, लाखोंचं नुकसान

“पूजा चव्हाणच्या आत्महत्येचं दुःख, पण बंजारा समाजाची बदनामी थांबवा”

मित्रांसोबत पार्टीला जाण्यासाठी घराबाहेर, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा 28 दिवसांनंतर मृतदेह सापडला

(Major accident in Jalgaon)

Published On - 8:02 am, Mon, 15 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI