मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, आई-वडील-बहिणीचा मृत्यू, चिमुकला बचावला

पुण्याहून मुबंईकडे जाताना बोरघाट उतरताना फुडमॉल जवळ हा झाला अपघात.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, आई-वडील-बहिणीचा मृत्यू, चिमुकला बचावला
Raigad Accident

रायगड : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर एक विचित्र अपघात झाला. या अपघातात तब्बल पाच जणांचा मृत्यू (Accident In Mumbai-Pune Express Way) झाला आहे. तर पाच जण जखमी झाले आहेत. टेम्पो, ट्रेलर, कार सह अनेक गाड्या एकमेकांवर आदळल्याने हा अपघात घडला (Accident In Mumbai-Pune Express Way).

पुण्याहून मुबंईकडे जाताना बोरघाट उतरताना फुडमॉल जवळ हा झाला अपघात. या अपघातातील दोन जखमीनां अष्टविनायक (पनवेल) आणि अन्य दोघांना वाशी येथे मनपा रुग्णालयात आणि एकाला इतर रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

तर मृतांना खोपोली रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर शवविच्छेदन करण्यात येईल.

कसा घडला अपघात?

मुबंई-पुणे एक्सप्रेस वेवर एका कंटेनरने मागून टेम्पोला धडक दिली. टेम्पो पलटी झाल्यावर मागून येणाऱ्या दोन कार टेम्पोला धडकल्या. या चारही गाड्यांवर पाठीमागून येणारा टेम्पो धडकल्याने अपघाताची भीषणता आणखी वाढली. या अपघाताचे दोन्ही कारचा चक्काचुर झाला आहे.

या अपघातग्रस्त दोन कारमधील कुटुंबीय एकत्र पुण्याला एका कार्यक्रमाला गेले होते. कार्यक्रमावरुन परतताना हा अपघात झाला. तर अन्य दोन कार सोबत होत्या. परंतु, घाटात मुबंईकडे जाताना दोन कार पुढे निघुन गेल्या आणि या दोन कारचा अपघात झाला.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे अपघात

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे अपघात

पाच वर्षांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये डॉ. वैभव वसंत झुझांरे (41, नेरुळ) याच्यांसह त्यांची पत्नी वैशाली झुंझारे (38), आई उषा झुंझारे (63), पाच वर्षांची मुलगी श्रिया झुंझारे (5) या चौघांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य एक 11 वर्षांचा मुलगा अर्णव झुंझारे हा गंभीर जखमी झाला आहे. त्यासह मंजू प्रकाश नाहर (58, गोरेगाव) यांचाही मृत्यू झाला आहे (Accident In Mumbai-Pune Express Way).

तर, स्वप्नील सोनाजी कांबळे (30), प्रकाश हेमराज नाहर (65), किशन चौधरी, काळूराम जमनाजी जाट हे या अपघातात जखमी झाले आहेत. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Accident In Mumbai-Pune Express Way

संबंधित बातम्या :

जळगाव ट्रक अपघातात एकाच कुटुंबातील दहा जणांचा मृत्यू, आभोळा गावावर शोककळा

जळगावात पपयांचा ट्रक उलटून भीषण अपघात; 15 मजूर जागीच ठार

‘सावधान इंडिया’च्या आर्ट डारेक्टरसह दोघे अपघातात ठार; 20 तासांची शिफ्ट संपवून घरी जाताना दुर्घटना

सुट्टीच्या दिवशी ट्रक आणि बसचा भीषण अपघात, 13 लोकांचा जागीच मृत्यू तर 4 जखमी

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI