अवनी वाघिणीच्या बछड्यांकडून घोड्याची शिकार

विवेक गावंडे, टीव्ही 9 मराठी, यवतमाळ : नरभक्षक अवनी वाघिणीच्या बछड्यांनी घोड्याची शिकार केली आहे. वनविभागाने घोड्याला सावज म्हणून बांधलं होतं. कक्ष क्रमांक 655 मध्ये बछड्यांनी ही शिकार केली. बछड्यांनी शिकार केल्यामुळे त्यांच्या उपासमारीची भीती मिटली आहे. यामुळे वनविभागाला मोठा दिलासा मिळाला आहे. तब्बल 13 ग्रामस्थांचा जीव घेतल्यानंतर वनविभागाकडून अवनी वाघिणीला गोळ्या घालून ठार करण्यात …

अवनी वाघिणीच्या बछड्यांकडून घोड्याची शिकार

विवेक गावंडे, टीव्ही 9 मराठी, यवतमाळ : नरभक्षक अवनी वाघिणीच्या बछड्यांनी घोड्याची शिकार केली आहे. वनविभागाने घोड्याला सावज म्हणून बांधलं होतं. कक्ष क्रमांक 655 मध्ये बछड्यांनी ही शिकार केली. बछड्यांनी शिकार केल्यामुळे त्यांच्या उपासमारीची भीती मिटली आहे. यामुळे वनविभागाला मोठा दिलासा मिळाला आहे.

तब्बल 13 ग्रामस्थांचा जीव घेतल्यानंतर वनविभागाकडून अवनी वाघिणीला गोळ्या घालून ठार करण्यात आलं. मात्र वाघिणीच्या मृत्यूनंतर तिच्या बछड्यांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झालाय. उपासमारीमुळे बछड्यांनीही मनुष्यवस्तीत प्रवेश करु नये यासाठी वनविभागाकडून प्रयत्न सुरु आहेत.

जवळपास 47 दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यातील जंगलात ‘T1’ या नरभक्षक वाघिणीचा शोध घेतला जात होता. या वाघिणीचा अखेर खात्मा करण्यात यश आलं. मात्र, ‘T1’ वाघिणीसाठी गेल्या काही दिवसांपासून प्राणीप्रेमींनी सोशल मीडियावर मोहीम राबवली होती. ‘अवनी’ असे या नरभक्षक वाघिणीला नाव देत, तिच्यासाठी राजकीय नेत्यांपासून अगदी बॉलिवूड कलाकारांपर्यंत सगळ्यांनीच अवनीला वाचवण्याच्या मोहिमेत सहभाग घेतला होता.

अवनी वाघिणीमुळे गावकऱ्यांमध्ये मात्र दहशत होती. शिवाय तिच्या बछड्यांना पकडावं, अशीही गावकऱ्यांची मागणी आहे. कारण, अवनीचा धोका टळला असला तरी बछड्यांचा धोका अजून कायम असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. अवनीला ठार केल्यानंतर गावकऱ्यांनी जल्लोष केला होता.

गावकऱ्यांनी जल्लोष करत काही दिवसांपूर्वीच अवनी वाघिणीला ठार करणारे शार्पशूटर नवाब शहाफत अली खान आणि त्यांच्या मुलाचा चांदीचा वाघ देऊन सत्कार केला होता.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *