
Mumbai Prostitution History: वेश्या व्यवसाय हा काही नवीन व्यवसाय नाही, कित्येक वर्षांपासून वेश्या व्यवसाय सुरु आहे. पण मुंबईत वेश्या व्यवसाय कसा आणि कधी फोफावला याबद्दल फार कोणाला माहिती नाही. तर एका कालव्यामुळे मुंबईत वेश्या व्यवसाय फोफावला. 1869 मध्ये सुएझ कालवा व्यापारासाठी खुला करण्यात आला. ज्यामुळे सागरी मार्ग लहान झाले आणि जागतिक व्यापार, प्रवासात एका नवीन युगाची सुरुवात झाली. त्यामुळे पश्चिम भारतातील आधीच प्रमुख बंदर असलेलं मुंबई आणखी महत्त्वाचं बनलं.
एका कालव्यामुळे युरोप आणि भारतामधील जहाज वाहतूक आणि व्यापार वेगाने वाढला, ज्यामुळे शहरात परदेशी जहाजे आणि प्रवाशांची संख्या वाढली. या वाढत्या सागरी वाहतुकीमुळे मुंबई जागतिक व्यापाराचं केंद्र बनलं. दोन देशांमधील व्यवसाय वाढला त्याच प्रमाणे वेश्यावृत्तीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली.
सुएझ कालवा आफ्रिकेच्या उत्तरेकडील भागात इजिप्तमध्ये स्थित आहे. हे जगातील सर्वात महत्त्वाच्या मानवनिर्मित कालव्यांपैकी एक आहे. या कालव्याची लांबी जवळपास 193 किलोमीटर आहे आणि सुएझ कालव्यामुळे आफ्रिका आणि आशियामधील समुद्री प्रवास मोठ्या प्रमाणात सुलभ झाला. ज्यामुळे व्यापार जलद आणि स्वस्त झाला. खरेदी तसेच विक्रीसाठीचा व्यवसाय हा करारान्वये तसेच कंत्राटानुसार होऊ लागला, असा उल्लेख बॉम्बे चेंबर्स एण्ड कॉमर्स एण्ड इंडस्ट्रीने केलेला आहे.
1869 मध्ये सुएझ कालवा सुरु झाल्यामुळे युरोप आणि भारतामधील प्रवास आणि व्यापाराचा वेळ लक्षणीयरीत्या कमी झाला. पश्चिम भारतातील आधीच एक महत्त्वाचं बंदर असलेलं मुंबई या नवीन सागरी मार्गामुळे आणखी महत्त्वाचं बनलं. शहरात विदेशी जहाज आणि लोकांची सध्या वाढली. या वाढत्या व्यापार आणि रहदारीमुळे मुंबईत वेश्याव्यवसाय वाढला. अनेक युरोपीय महिला, विशेषतः पूर्व युरोपातील महिला, आर्थिक अडचणी आणि सक्तीमुळे या व्यवसायात ओढल्या गेल्या.
विदेशी जहाजांच्या आगमनाने महिलांनी शहरात स्वतःचं स्थान निर्माण केलं आणि या व्यवसायात श्रीमंतांचा, शिपिंग कंपन्यांच्या दलालांचा देखील प्रभाव दिसून आला.
मुंबईतील सफेद गल्ली, डंकन रोड आणि फॉकलंड रोड सारख्या भागात परदेशी आणि भारतीय महिलांकडून होणारा वेश्याव्यवसाय दिवसागणिक फोफावत होता. मुंबईतील कामाठीपुरा परिसरात आज देखील वेश्या व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. या भागात वेश्यालयासारखी व्यवस्था होती जिथे महिला मालकांच्या देखरेखीखाली काम करत असत आणि त्यांचा व्यवसाय चालवत असत.
1898 मध्ये मुंबई पोलिस आयुक्त विन्सेंट यांनी वेश्यांविरुद्ध कारवाई सुरू केली. यामध्ये महिलांच्या घरांची तपासणी, मद्यपी आणि गुंडांवर नियंत्रण आणि असामाजिक कारवायांना आळा घालण्याचे प्रयत्न समाविष्ट होते. पण, असंख्य सामाजिक आणि कायदेशीर अडथळ्यांमुळे, हा व्यापार पूर्णपणे नष्ट होऊ शकला नाही. तर व्यवसायात दिवसागणिक वाढ होऊ लागली. याचं मुख्या कारण म्हणजे, आर्थिक आणि सामाजिक असमानता, विदेशी प्रवाशांची वाढती संख्या आणि मुंबईचं वाढतं व्यावसायिक महत्त्व. अधिक जहाजांचे आगमन आणि बंदराचा विस्तार यामुळेही व्यापाराला चालना मिळाली.
मुंबईतील वेश्याव्यवसायावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि पीडित महिलांना मदत करण्यासाठी सरकारी आणि गैर-सरकारी संस्था काम करत आहेत. गेल्या काही वर्षात पोलिसांनी अनेक सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. ज्यामुळे या व्यवसायात बळजबरी अडकलेल्या मुलींची सुटका करण्यात आली.
सांगायचं झालं तर, हा व्यवसाय आता लहान शहरे आणि आसपासच्या भागात पसरला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मचा देखील यामध्ये मोठा वाटा आहे. याच कारणामुळे त्यावर पूर्णपणं नियंत्रण ठेवणे आव्हानात्मक बनत आहे.