नागपुरात एका दिवसात दारु विक्रीतून किती महसूल मिळाला?

नागपुरात एका दिवसात दारु विक्रीतून किती महसूल मिळाला?

नागपूर जिल्ह्यात कालपासून दारुची विक्री सुरु झाली आहे. (Nagpur wine shops) नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात टोकन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीनं दारुविक्री सुरु झाली आहे.

सचिन पाटील

|

May 16, 2020 | 2:48 PM

नागपूर : नागपूर जिल्ह्यात कालपासून दारुची विक्री सुरु झाली आहे. (Nagpur wine shops) नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात टोकन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीनं दारुविक्री सुरु झाली आहे. जिल्ह्यात काल एक लाख सहा हजार 330 लिटर दारुची विक्री झाली. या दारु विक्रीतून एकाच दिवसात 92 लाख रुपयांचा महसूल सरकारच्या तिजोरीत जमा झाला. (Nagpur wine shops)

काल दिवसभरात 8 हजार पेक्षा जास्त परवाना वाटप झाला असून, 45 हजार परवाने छापण्यात आले आहेत, अशी माहिती उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधिक्षक प्रमोद सोनोणे यांनी दिली. काल नागपूर शहरालगतच्या ग्रामीण भागातील दारु दुकानात मोठी गर्दी होती, त्यामुळे शहरालगतच्या ग्रामीण भागातील गर्दीमुळे विदेशी दारुची टोकन विक्री बंद करण्यात आली. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी याबाबतचे आदेश काढले.

नागपुरात दिवसभरात किती दारुविक्री?

  • देशी दारु – 58 हजार 504 लिटर
  • विदेशी दारु – 23 हजार 103 लिटर
  • बिअर – 24 हजार 700 लिटर
  • एकूण – 1 लाख,6 हजार 330

भर उन्हात दारुसाठी रांगा

नागपुरात सूर्यदेव आग ओकत आहे, मात्र या उन्हाची तमा न बाळगता तळीराम दारुसाठी रांगा लावताना दिसत आहेत. शहरात ऑनलाईन विक्री असल्याने आणि परवान्याची अट असल्याने अनेक तळीरामांनी ग्रामीण भाग गाठला आणि तिथे रांगा लावल्या. हिंगणा रोडवर असलेल्या वाईन शॉपसमोर भर उन्हात गर्दी होती. नागपूरच्या ग्रामीण भागातील दृश्ये अगदी अशीच आहेत.

संबंधित बातम्या 

Nagpur Lockdown | नागपूरच्या ग्रामीण भागात टोकन पद्धतीने दारुविक्री

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें