AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निकालाला येणारी सूज अन् विद्यार्थ्यांना मिळणारी सर्वाधिक टक्केवारी कमी झालीय, कुणी दिली प्रतिक्रिया?

HSC Result : बारावीचा निकाल जाहीर झाला असून छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल 88.68 टक्के लागला आहे. हा निकाल गतवर्षी तुलनेत 2.9% टक्क्यांनी घसरला आहे.

निकालाला येणारी सूज अन् विद्यार्थ्यांना मिळणारी सर्वाधिक टक्केवारी कमी झालीय, कुणी दिली प्रतिक्रिया?
hsc ResultImage Credit source: Google
| Updated on: May 02, 2026 | 4:52 PM
Share

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 12 वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्याचा एकूण निकाल 89.79 लागला असून दरवर्षीप्रमाणे कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 94 टक्के लागला आहे. तर लातूरचा निकाल सर्वात कमी 84 टक्के लागला. छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल 88.68 टक्के लागला आहे. हा निकाल गतवर्षी तुलनेत 2.9% टक्क्यांनी घसरला आहे. सध्या औरंगाबाद विभागातील एकूण 549 विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. निकालाचा टक्का घसरल्याने छत्रपती संभाजीनगर विभागाचे अध्यक्ष अनिल साबळे महत्त्वाची माहिती दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

संभाजीनगर विभागाचा निकाल घटला

छत्रपती संभाजीनगर विभागाचे अध्यक्ष अनिल साबळे यांनी म्हटले की, फेब्रुवारी – मार्च 2026 मध्ये आपण उच्च माध्यमिकची परीक्षा घेतली होती. आज उच्च माध्यमिकचा निकाल माननीय राज्य मंडळाने घोषित केला आहे. राज्याचा निकाल 89.79 टक्के एवढा लागला असून छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल 88.68 टक्के लागला आहे. मागच्या वर्षी छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल 91.88 टक्के एवढा निकाल लागला होता यावर्षी 89.79 टक्के एवढा लागला आहे.

पुढे बोलताना साबळे म्हणाले की, मागच्या वर्षीच्या तुलनेत 2.9% ने कमी निकाल लागला आहे. एकूण 1 लाख 82 हजार 688 मुले परीक्षेला बसले होती त्यातील 1 लाख 62 हजार 22 विद्यार्थी पास झाले आहेत. नेहमीप्रमाणे या वर्षी देखील मुलींनी निकालात बाजी मारली आहे. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा 6.35 टक्क्यांनी जास्त आहे.

परीक्षा काळात 58 गैरप्रकार

परीक्षा दरम्यान गैरप्रकार झाला होता, यावर बोलताना साबळे म्हणाले की, परीक्षेदरम्यान जवळपास 58 गैरप्रकार आपल्याकडे झाले होते, यापैकी 56 प्रकरणाची आपण चौकशी पूर्ण करून विद्यार्थ्यांवर कारवाई करायची की निकाल जाहीर करायचे याबाबत निर्णय घेतला आहे. 54 प्रकरणात मुलांची त्या विषयातील संपादनूक रद्द केले आहे. दोन प्रकरणात मुले निर्दोष आढळल्यामुळे त्यांचे निकाल जाहीर केले आहेत.

विभागात जे दोन मोठे प्रकरण झाले होते, चौसाळा आणि जैतापूर येथील निकाल आपण राखीव ठेवले आहेत, चौकशी अंतिम टप्प्यात आली आहे, चौकशी झाली की आपण निर्णय घेणार आहोत. ज्या केंद्रावर गैरप्रकार झाले आहेत त्यांना नोटीस देणार आहोत, सुनावणी घेणार आहोत. प्रकरणानुसार जे केंद्र दोषी आहेत ते रद्द करण्यात येतील.

मुलांना मिळणारी टक्केवारी घटली

निकाल दोन टक्क्यांनी घसरण्याचे कारण काय यावर बोलताना साबळे म्हणाले की, बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की फिजिक्सचा, गणिताचा गणिताचा पेपर कठीण होता. आपण जे कॉफी मुक्त अभियान राबवत आहोत याचा देखील चांगला परिणाम आपल्याला दिसून येत आहे. प्राविण्यात म्हणजे 75 टक्के पेक्षा अधिक मार्काने येणारी मुले राज्यात फक्त 9.96% एवढे आहेत, 60% च्या वर गुण घेणाऱ्या मुलांची संख्या सुद्धा कमी आहे. निकालाला येणारी सूज, मुलांना जास्त प्रमाणात येणारी टक्केवारी बऱ्यापैकी कमी झाली आहे.

अनेक विद्यार्थ्यांचा निकाल राखीव

निकालाच्या वैशिष्ट्यांवर बोलताना साबळे म्हणाले की, मुलींना जर आपण संधी दिली तर मुली नेहमीच कशा अग्रेसर राहतात हे गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहत आहे. जेव्हा जेव्हा मुलींना संधी मिळते तेव्हा तेव्हा मुलांपेक्षा घरातले काम करून अभ्यास करून मुली चांगल्या पद्धतीने पास होतात. किती विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला यावर बोलताना त्यांनी सांगितले की, 501 विद्यार्थ्यांचा निकाल बोर्ड प्रकरणात आणि 48 विद्यार्थ्यांचा निकाल इतर प्रकरणात राखीव ठेवण्यात आला आहे.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!