AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navneet Rana : ‘पण त्यांची ती अट मला मान्य नव्हती’, नवनीत राणांचा सुनेत्रा पवारांसोबत झालेल्या चर्चेवर खुलासा

Navneet Rana : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राज्यसभेचा उमेदवार आता फायनल झाला आहे. पण त्याआधी या खासदारकीसाठी नवनीत राणा यांच्या नावाची चर्चा होती. नवनीत राणा यांनी सुनेत्रा पवारांसोबत बैठकीत काय चर्चा झाली? यावर खुलासा केला आहे.

Navneet Rana : 'पण त्यांची ती अट मला मान्य नव्हती', नवनीत राणांचा सुनेत्रा पवारांसोबत झालेल्या चर्चेवर खुलासा
Navneet Rana-Sunetra Pawar
| Updated on: Jun 09, 2026 | 9:32 AM
Share

राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी चार उमेदवारांच्या नावाची चर्चा होती. नवनीत राणा, छगन भुजबळ, बीडचे अमरसिंह पंडित आणि भंडाऱ्याचे राजेंद्र जैन. या चौघांपैकी अखेर राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे. राज्यसभेच्या या जागेसाठी माजी खासदार, भाजप नेत्या नवतीन राणा यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेवर जाण्यासाठी नवनीत राणा यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेशाची अट घालण्यात आली होती. आता नवनीत राणा यांनी फेसबुकवर पोस्ट करुन नेमकी काय चर्चा झाली? त्यांची भूमिका काय आहे? या बद्दल खुलासा केला आहे.

“भारतीय जनता पार्टीची मी प्रामाणिक निष्ठावान कार्यकर्ता आहे. मी कोणत्याही पदासाठी आपली विचारधारा बदलणार नाही. मी सदैव भारतीय जनता पार्टीचे कार्य प्रामाणिकपणे करत राहील” असं सांगून नवनीन राणा यांनी राष्ट्रवादीच्या प्रवेशावर पूर्ण विराम लावला आहे. “आदरणीय सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार आणि पार्थदादा पवार यांनी मला राज्यसभेवर पाठवण्याबाबत इच्छा व्यक्त केली होती. मात्र राज्यसभेच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची अट मला मान्य नव्हती” असं नवनीत राणा म्हणाल्या.

परंतु काही कारणास्तव हे शक्य झाले नाही

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून मी सुनेत्रा वहिनी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राज्यसभेची जागा भारतीय जनता पक्षाला सोडण्याची विनंती केली होती. परंतु काही कारणास्तव हे शक्य झाले नाही. तरी देखील माझ्यावर विश्वास ठेवून मला राज्यसभेची संधी देण्याचा विचार केल्याबद्दल मी सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांचे व पार्थ दादा पवार यांची आभारी आहे” असं नवनीत राणा म्हणाल्या.

..म्हणून छगन भुजबळ यांचं राज्यसभेवर जाणं बारगळलं

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी सहमत होते. पण आपण राज्यसभेवर गेल्यानंतर आपला पुतण्या समीर भुजबळ यांना मंत्रिपद मिळावं अशी भुजबळांची इच्छा होती. पण याला भाजप श्रेष्ठींकडून नकार होता.त्यामुळे छगन भुजबळ यांचं राज्यसभेवर जाणं बारगळलं.

Follow Us
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली