ED| मी स्वतः ईडी कार्यालयात जायला तयार, सोमय्यांना प्रवक्ता बनवलं असेल तर जाहीर करा; मलिकांकडून सव्याज परतफेड

ED| मी स्वतः ईडी कार्यालयात जायला तयार, सोमय्यांना प्रवक्ता बनवलं असेल तर जाहीर करा; मलिकांकडून सव्याज परतफेड
नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेस.

मलिक म्हणाले की, वक्फ बोर्डाच्या कुठल्याच बोर्डावर छापेमारी झालेली नाही. फक्त काल एका वक्फ बोर्ड अधिकाऱ्याला बोलावण्यात आलं.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मनोज कुलकर्णी

Dec 11, 2021 | 3:00 PM

मुंबईः अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शनिवारी भाजप नेते किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपाला जोरदार प्रत्युत्तर देत सव्याज परफेड केली. मी स्वतः ईडीच्या कार्यालयात जायला तयार आहे. सोमय्य्यांना ईडीने प्रवक्ता बनवलं असेल, तर जाहीर करावं, असे खुलं आवाहनही त्यांनी केले.

ट्वीटपासून नमन

नवाब मलिकांनी काल ट्वीट केल्यापासून पुन्हा एकदा नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. साथियों, सुना है, मेरे घर आज-कल मे सरकारी मेहमान आने वाले है, हम उनका स्वागत करते है. डरना मतलब रोज रोज मरना, हमे डरना नहीं, लड़ना है, गांधी लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से, असे मलिक यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे. यावरून भाजप नेते किरीट सोमय्यांनी आज मलिकांना घेरले.

सोमय्यांचा आरोप

सोमय्यांनी आज नवाब मलिकांवर जोरदार आरोप केले. ते म्हणाले, मलिकांनी वक्फ बोर्डाच्या जमिनी ढापल्या आहेत. हा घोटाळा बाहेर आलाय म्हणूनच ते हात-पाय मारत आहेत. त्यांच्या घरी सरकारी पाहुणे नक्की जाणार, असा दावा त्यांनी केला. मलिक आत्ता ट्वीट करतात. कारण त्यांना भीती वाटतेय. पुण्यात नवाब मलिक यांनी वक्फ बोर्डात घोटाळा केला आहे. ही जमीन नातेवाईकांच्या नावे केली आहे. जमिनी ढापल्या आहेत. त्यामुळेच नवाब मलिक यांना भीती वाटत आहे. आता घोटाळेबाजांची चौकशी होणार आणि चोरीचा माल जप्त होणार. पैसे देऊन, प्रेशर करून घोटाळा लपत नाही. चोरी केली तर शिक्षा होणारच, असा दावाही सोमय्यांनी केला.

मलिकांचे प्रत्युत्तर

किरीट सोमय्यांच्या आरोपाला नवाब मलिकांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, मी स्वतः ईडीच्या कार्यालयात जायला तयार आहे. माझ्या घरी धाड पडणार, अशी अनेक दिवसांपासून माहिती आहे. जर सोमय्यांना ईडीने प्रवक्ता बनवलं असेल तर त्यांनी तसं जाहीर करावं, असा आवाहनही त्यांनी यावेळी दिलं.

खोट्या बातम्या पेरल्या

मलिक म्हणाले की, वक्फ बोर्डाच्या कुठल्याच बोर्डावर छापेमारी झालेली नाही. फक्त काल एका वक्फ बोर्ड अधिकाऱ्याला बोलावण्यात आलं. खोट्या बातम्या पसरवून बदनाम करण्याचं काम थांबवा. वक्फ बोर्डानं कोणत्या केस रजिस्टर केल्या आहेत, त्याची माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

इतर बातम्याः

Special Report: जीवन नशीलं, राज्यसत्ता कारस्थान अन् राज्य लोकांना भ्रष्ट करणारं षडयंत्र; सत्य उच्चारून श्वास सोडणाऱ्या ‘लिओ’ची चित्तरकथा!

scam: आदिवासी महामंडळ नोकरभरती घोटाळ्यात 2 बड्या अधिकाऱ्यांवर 5 वर्षांनी गुन्हा, राजकीय पदाधिकाऱ्याला अभय

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें