AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे गटाच्या बड्या नेत्याला एक महिन्यापूर्वीच लागली होती बंडाची खबर, मातोश्रीतून हालचालच नाही? मोठी अपडेट समोर

शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे, 6 खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या बड्या नेत्यानं मोठा गौप्यस्फोट केला आहे. या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

ठाकरे गटाच्या बड्या नेत्याला एक महिन्यापूर्वीच लागली होती बंडाची खबर, मातोश्रीतून हालचालच नाही? मोठी अपडेट समोर
उद्धव ठाकरे Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 17, 2026 | 6:00 PM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे 9 पैकी 6 खासदार फुटले आहेत. ते लवकरच वेगळा गट स्थापन करण्याची शक्यता आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता शिवसेना ठाकरे गटात घडामोडींना वेग आला आहे. उद्या पक्षाने खासदारांची बैठक बोलावली आहे. सर्व खासदारांना शिवसेना ठाकरे गटाकडून व्हीप जारी करण्यात आला आहे. आता उद्या या बैठकीला किती खासदार उपस्थित राहणार? यावरून सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. हे सर्व आपल्याला एक महिन्यापूर्वीच माहिती होतं असं त्यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले खैरे? 

ज्या शिवसेनाप्रमुखांनी ही शिवसेना मराठवाड्यात रुजवली तीन  तीन खासदार निवडून गेले. उद्धव साहेबांनी या तिघांचा पण प्रचार केला.  त्यांना निवडून आणलं, पण त्यांनी उद्धव साहेबांचासुद्धा घोर अपमान केला. त्यांनी वचन पाळलं नाही, कोणी आई वडिलांची शपथ घेतली होती, कोणी साईबाबांची शपथ घेतली होती, पण यांच्या शपथेवर विश्वास कसा ठेवणार? असा सवाल यावेळी खैरे यांनी केला आहे.

पुढे बोलताना खैरे यांनी म्हटलं की,  या  गटाला मी सांगेल की तुम्ही उद्धव ठाकरेंचे झाले नाहीत, त्यांचे कधी होणार? तुम्ही त्यांना पण कधीतरी धोका देणार. हा सगळा प्रकार पैशाचा आहे, एक महिना अगोदरच मला माहीत झालं होतं फूट पडणार आहे, सहा जण जात आहेत. अशी फाटाफट करून तुम्ही तुमचं बळ वाढवत आहात, मात्र बळ वाढवून फायदा नाही हे खोटे बळ आहे.  शिवसैनिक चवताळून उठतो आम्ही सगळे चवताळून उठलो आहोत.  91 ला भुजबळ हे पंधरा लोकांना घेऊन फुटले होते, तेव्हाही आम्हाला वाईट वाटलं होतं, आताही वाटत आहे.  मात्र शिवसैनिकांनी संघर्ष केला आहे, असंही यावेळी चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
राजकीय हालचालींना वेग! NCP तील मंत्र्यांची तातडीची बैठक, काय घडणार?
राजकीय हालचालींना वेग! NCP तील मंत्र्यांची तातडीची बैठक, पुढे काय घडणार?
सिया केतन प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर! थेट पंतप्रधानांना पत्र
सिया केतन प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर! थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं पत्र
फक्त चर्चा की सत्य, राष्ट्रवादी पक्ष लवकरच फुटणार? बड्या नेत्याच्या
NCP | फक्त चर्चा की सत्य, राष्ट्रवादी पक्ष लवकरच फुटणार? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
संजय राऊत संतापलेच! 92 लाख लाडक्या बहिणी योजनेतून बाद झाल्यानंतर थेट..
संजय राऊत संतापलेच! 92 लाख लाडक्या बहिणी योजनेतून बाद झाल्यानंतर थेट...
ओमराजे की श्रीकांत शिंदे, अमित शहांचा वरदहस्त नेमका कोणावर? दिल्लीतील
ओमराजे की श्रीकांत शिंदे, अमित शहांचा वरदहस्त नेमका कोणावर? दिल्लीतील बैठकीत...
थेट "भावी कॅबिनेट मंत्री..." बीडमधील मुंडेंच्या बॅनर्सची जोरदार चर्चा,
Dhananjay Munde | थेट
मोठी बातमी! शिवसेनेला लॉटरी लागणार? फुटीर खासदार थेट दिल्लीत...
मोठी बातमी! शिवसेनेला लॉटरी लागणार? फुटीर खासदारांना थेट दिल्लीत... अमित शहांसोबत महत्त्वाची बैठक
अखेर निर्णय होणारच! शरद पवारांचे 10 पैकी 9 आमदार... मोठी राजकीय घडमोड
अखेर निर्णय होणारच! शरद पवारांचे 10 पैकी 9 आमदार... मोठी राजकीय घडमोड
मला महिला आयोगाची अध्यक्ष करा मग... गिरीजा राऊत प्रकरणी बोलताना करुणा
मला महिला आयोगाची अध्यक्ष करा मग... गिरीजा राऊत प्रकरणी बोलताना करुणा मुंडे हे काय बोलून गेल्या?
सुनेत्रा पवार यांचे अध्यक्षपद अवैध? थेट नोटीस पाठवल्याने एकच खळबळ;
सुनेत्रा पवार यांचे अध्यक्षपद अवैध? थेट नोटीस पाठवल्याने एकच खळबळ; राष्ट्रवादी पक्षातील संघर्ष चव्हाट्यावर?