AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sudhir Mungantiwar : ‘मी मंत्रिमंडळ विस्तारासाठी दिल्लीला..’, सुधीर मुनगंटीवार मंत्रि‍पदाच्या विषयावर जे मनात आहे ते स्पष्ट बोलले

Sudhir Mungantiwar : "शेतकरी म्हणतात सरकारी नोकरीत मुलाला पाठवेल, पण शेती करु देणार नाही. ही वेदना आहे. शेती मजबूतीचा व्यवसाय व्हावा. आजकाल शेतकरी कुणाला व्हायचं नाही, ही चिंतेती बाब आहे. मला राजकारणी व्हायचं आहे, असं कोणी म्हणत नाही. गुणवंत राजकारणी होत नसेल तर ही चिंतेची बाब आहे" असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

Sudhir Mungantiwar : 'मी मंत्रिमंडळ विस्तारासाठी दिल्लीला..', सुधीर मुनगंटीवार मंत्रि‍पदाच्या विषयावर जे मनात आहे ते स्पष्ट बोलले
Sudhir Mungantiwar
| Updated on: Jun 09, 2026 | 12:18 PM
Share

स्वतंत्र भारतात सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहण्याचा पंडित जवाहरलाल नेहरु यांचा रेकॉर्ड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोडला आहे. नरेंद्र मोदी हे देशाचं सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवणारे नेते बनले आहेत. 9 जून 2024 रोजी त्यांनी एनडीएच्या तिसऱ्या कार्यकाळात पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. त्यांना सत्तेत राहून आज 12 वर्ष सुद्धा पूर्ण होत आहेत. पीएम मोदी यांनी 26 मे 2014 रोजी पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. आज 9 जून 2026 रोजी त्यांचा 4398 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. आता ते सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषवणारे नेते बनले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या यशावर भाजपचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार बोलले आहेत. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 12 वर्षांचा कार्यकाळ समृद्ध करणारा आहे. भारतीय जनतेचं आभार, या जनतेनं देश घडवण्यासाठी मोदीजी यांना आशीर्वाद दिला. पंडीत नेहरुंच्या कार्यकाळापेक्षा मोदीजी यांनी जास्त काळ पंतप्रधान म्हणून देशाची सेवा केली, हा आनंदाचा दिवस आहे” असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. “नेहरुजी आणि मोदीजी यांची तुलना होऊ शकत नाही. एक नेतृत्व देशाच्या स्वातंत्र्याचा संघर्ष सुरु होता त्या काळातील होतं, इंदिराजी यांनी संविधानाची हत्या केली, त्या काळात घडलेले एक नेतृत्व आहे” असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. “नेहरु जी आणि पंतप्रधान मोदीजी यांच्या कार्यकाळातील समस्या वेगळ्या आहेत. मोदीजी यांनी वसुदेव कुटुंब कम असा गौरव दिला” असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

जी जबाबदारी मिळेल ती पूर्ण करायची

“माझा दिल्ली दौरा हा माझ्या मतदारसंघातील विकासासाठी होता. मी माझ्या मतदारसंघात अनेक विकासकामं केली आहेत. मी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दिल्लीला जात नाही. माझ्या मतदारसंघातील कामासाठी आलोय. राज्यातील विविधी विभागातून निधी आणला, आता दिल्लीतून आणणार. महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मला माहित नाही” असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. “मी अनेक लक्षवेधी टाकल्या. मंत्रीपद माझ्यासाठी महत्त्वाचा विषय नाही. जी जबाबदारी मिळेल ती पूर्ण करायची. मला सात वेळा निवडून दिलं, हे मोठं बक्षिस आहे. माझ्या मतदारसंघात अनेक विकास कामं केली. मंत्रीपद येईल जाईल याची चिंता मी केली नाही” असं सुधीर भाऊ म्हणाले.

राहुल गांधी कधीही पंतप्रधान होऊ शकत नाहीत, ही देवाची इच्छा

“इंडीया आघाडीत पंतप्रधान पदाचा चेहरा घोषीत करणं म्हणजे मध्य रात्री सूर्याने उगवण्यासारखं आहे. ज्या वेळी पंतप्रधान पदाचा चेहरा घोषित होईल. त्यावेळेस इंडीया आघाडी तुटेल. त्यामुळेच आमचे जुने मित्र उद्धवजी यांनी हा बॅाम्ब टाकला. उद्धवजी एनडीए सोबत येवो अथवा नको, पण त्यांची कृती पंतप्रधान पदाचा चेहरा घोषीत करा म्हणने, हा त्यातलाच भाग आहे” असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. “राहुल गांधी कधीही पंतप्रधान होऊ शकत नाहीत, ही देवाची इच्छा आहे” असं मुनगंटीवार म्हणाले.

 

Follow Us
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी