AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IAS पूजा खेडकरचा आणखी एक कारनामा, खोटा पत्ता देऊन मिळवलं अपंगत्वाचे प्रमाणपत्र

पूजा यांचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पूजा यांनी घरचा खोटा पत्ता दिल्याचं उघड झालं आहे. तसेच त्यांनी बनावट रेशन कार्ड दिल्याचही उघड झालं आहे. ही माहिती उघड झाल्याने आता त्यांच्या अडचणी आणखीनच वाढू शकतात.

IAS पूजा खेडकरचा आणखी एक कारनामा, खोटा पत्ता देऊन मिळवलं अपंगत्वाचे प्रमाणपत्र
| Updated on: Jul 17, 2024 | 9:55 AM
Share

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर सध्या तिच्या कारनाम्यांमुळे भलतीच चर्चेत आहे. प्प्रक्षिणार्थी असताना गाडी, कॅबिन, गाडीवर अंबर दिवा, अधिकाऱ्यांना धमकवणे असे प्रकार पूजा खेडकर यांनी केले होते. त्यामुळे त्या अडचणीत सापडल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांचेही अनक कारनामे उघड झाले. बंदूक घेऊन शेतकऱ्यांना धमकावल्याप्रकरणी तिची आई मनोरमा यांच्याविरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत असतात. पूजा त्यानंतर यांना परीक्षेत मुलाखतीत महाराष्ट्रा संदर्भातील प्रश्नांची उत्तरे आली नव्हती. तसेच या परीक्षेसाठी दिलेले दिव्यांग प्रमाणपत्र आणि उत्पन्न जास्त असताना घेतलेले क्रिमिलेअर प्रमाणपत्र या सर्व प्रकाराची माहिती माध्यमांमधून समोर येत आहे. त्यातच आता पूजा यांचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पूजा यांनी घरचा खोटा पत्ता दिल्याचं उघड झालं आहे. तसेच त्यांनी बनावट रेशन कार्ड दिल्याचही उघड झालं आहे. ही माहिती उघड झाल्याने आता त्यांच्या अडचणी आणखीनच वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दिला खोटा पत्ता, तिथे घर नाही तर बंद पडलेली कंपनी

वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राबाबतची महत्वाची माहिती समोर आली आहे. अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पूजा यांनी खोट पत्ता दिला होता. पिंपरी पालिकेच्या वायसीएम रुग्णालयाला खोटा पत्ता आणि बनावट रेशन कार्ड देऊन पूजा यांनी अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवल्याचं समोर आलं आहे. पिंपरी चिंचवड हद्दीत राहत असल्याचे सांगत, प्लॉट नंबर 52, देहू-आळंदी, तळवडे हा पत्ता खेडकरांनी रुग्णालयात दिला होता.

मात्र हा पत्ता रहिवासी भागाचा नसून तो एका कंपनीचा असल्याचं समोर आलं आहे. थर्मोव्हेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड नावाची ही कंपनी आहे, जी सध्या बंद अवस्थेत आहे. मात्र कंपनीचा पत्ता हा निवासाचा पत्ता म्हणून दिल्याने पूजा खेडकरांनी खोटी माहिती दिली होती, हे स्पष्ट झालं आहे. तिथे कोणीही रहिवासी नसताना, पूजा यांनी या कंपनीच्या पत्त्यावर बनावट रेशन कार्डही बनवल्याचं अन त्याचा वापर अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी केला अशी माहिती समोर आली आहे.

ऑडी कारची नोंदणीही याच पत्त्यावर

ही थर्मोव्हेरिटा कंपनी तीचं आहे, ज्याच्या नावावर अंबर दिवा लावलेली ऑडी कारची नोंद आहे. इतकंच नव्हे तर याच कंपनीचं गेल्या तीन वर्षांचं 2 लाख 77 हजार 688 रुपयांचा करही थकीत आहे. पिंपरी पालिकेच्या कर संकलन विभागाकडून ही माहिती मिळाली आहे.

पूजा खेडकरांचा सध्या वाशिमच्या शासकीय विश्रामगृहात मुक्कामी

वादात सापडलेल्या पूजा खेडकर यांचं महाराष्ट्रातील प्रशिक्षण सध्या थांबवण्यात आलं आहे. राज्य सरकारकडून त्यांना त्यासंदर्भात आदेश देण्यात आले आहेत. पूजा खेडकर यांना मसूरीला ट्रेनिंग सेंटरला हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खेडकर यांचा प्रशिक्षण कालावधी रद्द केल्यानंतर त्यांचा सध्या वाशिमच्या शासकीय विश्रामगृहात मुक्काम आहे. आज त्या वाशिम येथून निघण्याची शक्यता आहे. तेथून पूजा खेडकर थेट दिल्लीला जाणार असल्याची माहिती आली आहे. नागपूर येथून त्या विमानाने दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. प्रशिक्षण कालावधी रद्द झाल्यानंतर अद्याप त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. प्रशिक्षण कालावधी रद्द झाल्यानंतर त्यांचे शासकीय वाहन काढून घेण्यात आले असून आता पूजा या खासगी वाहनाने जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या सहा दिवसात शासकीय विश्राम गृहाच्या उपहारगृहाचे सुमारे सहा हजार रुपयांचे बिल त्यांनी भरले आहे.

खेडकर कुटुंबाच्या अडचणीत वाढ

पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांच्या अडचणीतही वाढ होणार आहे. आता एसीबी कडून खेडकर कुटुंबाची चौकशी करण्यात येणार आहे. खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी जमवलेल्या बेहिशोबी मालमत्तेचा अहवाल पुणे लाचलुचपत विभागाने वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला आहे. दिलीप खेडेकर यांनी बेकायदेशीरित्या मार्गाने करोडोची माया जमवली असल्याचा लाच लुचपतविभागाला संशय आहे. खेडकर यांच्या विरोधात लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल झाल्यानंतर लाचलुचपत विभागाने वरिष्ठ कार्यालयाला अहवाल पाठवून गुन्हा नोंद करून घेण्यासाठी अहवाल मागवला आहे. त्यामुळे आता लाचलुचपत विभाग खेडेकर कुटुंबाची चौकशी करणार आहे.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.