इचलकरंजी नगरपालिकेच्या सभापती निवडणुकीत मोठे बदल, भाजपसह आघाड्यांना कोणता विभाग?

इचलकरंजी नगरपालिका सभापती निवड प्रक्रिया पूर्ण झाली. यात मोठा बदल झाल्याचं पाहायला मिळालं.

इचलकरंजी नगरपालिकेच्या सभापती निवडणुकीत मोठे बदल, भाजपसह आघाड्यांना कोणता विभाग?

कोल्हापूर : इचलकरंजी नगरपालिका सभापती निवड प्रक्रिया पूर्ण झाली. यात मोठा बदल झाल्याचं पाहायला मिळालं. नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस आणि राजर्षि शाहू विकास आघाडी यांची सत्ता होती. त्यामध्ये आता काही बदल झाले आहेत. या आघाडीच्या सत्तेत काँग्रेसला बाजूला करुन ताराराणी विकास आघाडीला सामावून घेण्यात आलंय. इचलकरंजी नगरपालिका बांधकाम सभापतीपदी शाहू विकास आघाडीचे उदयसिंह पाटील यांची निवड झालीय. पाणीपुरवठा सभापती पदावर ताराराणी आघाडीचे दीपक सूर्वे यांची निवड झालीय. याशिवाय शिक्षण मंडळ सभापती भाजपचे मनोज साळुंखे यांची, तर महिला बालकल्याण सभापती पदावर भाजपच्या सारिका पाटील यांची निवड झाली. तसेच ताराराणी आघाडीचे संजय केंगार यांची इचलकरंजी नगरपालिका आरोग्य सभापती निवड करण्यात आली (Ichalkaranji Corporation Committee Chairman Election).

इचलकरंजी नगरपालिका विभागनिहाय सभापती निवड

  • बांधकाम सभापती – शाहू विकास आघाडीचे उदयसिंह पाटील
  • पाणीपुरवठा सभापती – ताराराणी आघाडीचे दीपक सूर्वे
  • शिक्षण मंडळ सभापती – भाजपचे मनोज साळुंखे
  • महिला बालकल्याण सभापती – भाजपच्या सारिका पाटील
  • आरोग्य सभापती – ताराराणी आघाडीचे संजय केंगार

इचलकरंजी नगरपालिकेमध्ये आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर आणि शाहू आघाडीचे मदन कारंडे, विठ्ठल चोपडे या सर्वांनी मिळून सभापतींची निवड केली. निवडणूक अधिकारी विकास खरात, संतोष खांडेकर यांनी सभापती निवड प्रक्रिया पार पाडली. यावेळी इचलकरंजी नगराध्यक्षा अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पवार आणि नगरसेवक-नगरसेविका उपस्थित होत्या. इचलकरंजी नगरपालिकेतील वेगवेगळ्या विभागाच्या सभापती आपल्या नेत्याची निवड झाल्यानंतर संबंधितांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटकेबाजी करून आनंदोत्सव साजरा केला.

दरम्यान, इचलकरंजी येथील नगरपालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडणुकांमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळाली. या पार्श्‍वभूमीवर मागील काही दिवसांपासून राजकीय हालचालींना वेग आला होता. वेगवान राजकीय घडामोडी पाहता भाजपा-काँग्रेस-राजर्षि शाहू विकास आघाडी यांची सत्ता कायम राहणार, की निवडीच्या निमित्ताने वेगळी गणिते जुळणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. विशेष म्हणजे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासन नियमांचे पालन करत ही सभा श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृह झाली. (Ichalkaranji Nagarpalika Committee Chairman Election)

नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस आणि राजर्षि शाहू विकास आघाडी यांची सत्ता होती. त्यामध्ये आता काही बदल झाले आहेत. या आघाडीच्या सत्तेत काँग्रेसला बाजूला करुन ताराराणी विकास आघाडीला सामावून घेण्यात आलंय.  इचलकरंजी नगरपालिकेच्या स्थायी समिती आणि विषय समित्यांचा कार्यकाल 6 जानेवारी 2021 रोजी संपला. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी निवडीसाठी आज (6 जानेवारी) सकाळी 11 वाजता प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले.

सकाळी 11 ते 1 विषय समिती आणि स्थायी समिती सदस्यांचे नामनिर्देशन करणे, दुपारी 1 ते 3 विषय समिती सभापतीसाठी मुख्याधिकारी यांच्याकडे नामनिर्देशन पत्र सादर करणे, दुपारी 3 ते 3.30 यावेळेत नामनिर्देशन पत्रांची छाननी, दुपारी 3.30 ते 4 वाजेपर्यंत माघार घेण्याची मुदत आणि त्यानंतर दुपारी 4 वाजता निवडी जाहीर करणे असा कार्यकम जाहीर करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

कोल्हापूर महापालिका निवडणूक भाजप ताकदीनिशी लढणार; चंद्रकांत पाटलांची घोषणा

कोल्हापूर महापालिका निवडणूक चंद्रकांत पाटलांचं भवितव्य ठरवणार?

Ichalkaranji Corporation Committee Chairman Election

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI