AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जरा आधी दवाखान्यात आलो असतो तर आमचे बाळ वाचले असते, हिंगोलीच्या आरोग्य केंद्रात नेमके काय घडले?

हिंगोलीच्या जवळा बाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्भवती महिलेला रुग्णवाहिका नाकारल्याने तिचे बाळ पोटातच दगावल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या प्रकरणाने आता प्रशासनाने आता डिझेलमुळे नव्हे तर कर्मचारी सुटीवर असल्याने रुग्णवाहिका देऊ शकलो नाही असे म्हटले आहे.

जरा आधी दवाखान्यात आलो असतो तर आमचे बाळ वाचले असते, हिंगोलीच्या आरोग्य केंद्रात नेमके काय घडले?
Hingoli Health Center: Fetal Death in Woman's Womb
| Updated on: May 28, 2026 | 4:21 PM
Share

हिंगोलीच्या जवळा बाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्भवती महिलेला रुग्णवाहिका नाकारल्याने तिचे बाळ पोटातच दगावल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या महिलेच्या नातेवाईकांनी पदरचे साडे आठशे रुपयांचे डिझेल खर्च करुन दुसऱ्या एका खाजगी वाहनाने दवाखाना हिंगोलीचा दवाखाना गाठला. मात्र, या महिलेचे बाळ तोपर्यंत पोटातच दगावले. या वेळी येथील डॉक्टरांनी आपल्याला सांगितले की जर तुम्ही अर्धा तास आधी आला असता तर तुमचे बाळ वाचले असते असे आम्हाला डॉक्टरांनी सांगितल्याची प्रतिक्रिया पीडित महिलेच्या नातेवाईकांनी दिली आहे.

राज्यातील ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेची अवस्था किती दयनिय झाली आहे. याचे विदारक सत्य दाखवणारी आणखी एक घटना घडली आहे. हिंगोलीच्या जवळा बाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्भवती महिलेला रुग्णवाहिका नाकारल्याने ती वेळेत पोहचू न शकल्याने या महिलेचे बाळ पोटात दगावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या संदर्भात या दुर्दैवी महिलेच्या नातेवाईकाने टीव्ही ९ मराठीला आपली व्यथा सांगितली आहे.

पीडीत महिलेची आजी म्हणाली की जवळा बाजारला आम्ही नालेगाववरुन मुलीला घेऊन आलो. आम्ही फोन लावला १०२ ला तर ते म्हणाले जवळ्यावरुन तुम्ही मोटरसायकलीवर आणा. तेथपर्यंत एम्ब्युलन्स येत नाही म्हटले. हिंगोलीहून एम्ब्युलन्स निघाली म्हटले. आम्ही मोटरसायकलीवर जवळा बाजारला आलो. जवळा बाजारच्या सरकारी आरोग्य केंद्रात बसलो. त्यानंतरही गाडी आली नाही. त्यानंतर ते म्हणाले की तुमची लयच अर्जंट असेल तर प्रायव्हेट गाडी करा. आमच्याकडे डिझेल नसल्याने गाडी पाठवू शकत नाही.

त्या पुढे म्हणाल्या की आमच्या पोरीच्या पोटात लयच दुखू लागले म्हणून म्हणून मग आम्ही  स्वत: गाडी केली. साडे आठशेचे डिझेल टाकून प्रायव्हेट गाडीने इकडे आलो. आम्ही तिला हिंगोलीत एडमिट केली. तर इथले डॉक्टर म्हणाले की ताई तुम्ही लवकर आणले असते तर बाळ वाचले असते. लवकर आले असते तर तुमचे बाळ वाचू शकत होते. तुम्हाला वेळ लागल्यामुळे तुमचे बाळ वाचू शकले नाही. लाडक्या बहिणीची हालअपेष्टा सरकार करत आहे असेही त्या म्हणाल्या.

डिझेल अभावी नव्हे तर यामुळे प्रकार घडला

जवळा बाजरा येथील प्रकरणात डीझेल अभावी  एम्ब्युलन्स मिळाली नाही असे  नव्हे तर एम्ब्युलन्सचा चालक हा सुट्टीवर असल्याने रुग्ण वाहिका पुरवू शकले नाहीत.  या प्रकरणाची चौकशी सुरु आता चौकशी करण्यात येत आहे. नेमके काय झाले आहे याचा तपास करुन योग्य कारवाई करण्याच येत असल्याची प्रतिक्रिया हिंगोली जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी दिली आहे.

Follow Us
बनावट सही करून खातं साफ; महिला डॉक्टरची लाखोंची फसवणूक
बनावट सही करून खातं साफ; महिला डॉक्टरची लाखोंची फसवणूक.
मोठी बातमी! कोल्हापुरात गंभीर प्रकरणी भाजप नेत्याला अटक, थेट राजस्थान
मोठी बातमी! कोल्हापुरात गंभीर प्रकरणी भाजप नेत्याला अटक, थेट राजस्थान.
अगोदर थुंकला अन् बनवली रोटी, मुंबईत हॉटेलमध्ये किळसवाणा प्रकार
अगोदर थुंकला अन् बनवली रोटी, मुंबईत हॉटेलमध्ये किळसवाणा प्रकार.
Thane | शिंदेच्या खेळीला भाजपाकडून धक्का? बविआतील राजीव पाटलांशी भेट..
Thane | शिंदेच्या खेळीला भाजपाकडून धक्का? बविआतील राजीव पाटलांशी भेट...
17 जागांवरून महायुतीत चर्चा; शिरसाट म्हणाले तिढा आजच सुटणार....
17 जागांवरून महायुतीत चर्चा; शिरसाट म्हणाले तिढा आजच सुटणार.....
भरधाव ट्रकचा थरारक अपघात! पुलाचे कठडे तोडून ट्रक थेट नदीत कोसळला
भरधाव ट्रकचा थरारक अपघात! पुलाचे कठडे तोडून ट्रक थेट नदीत कोसळला.
मोठी अपडेट! NEET पेपरफुटी प्रकरणी राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी बैठक
मोठी अपडेट! NEET पेपरफुटी प्रकरणी राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी बैठक.
मिरा-भाईंदर ते घाटकोपर… बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिसांचा
मिरा-भाईंदर ते घाटकोपर… बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिसांचा.
राजकारणात मोठं घडणार? देवेंद्र फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट...
राजकारणात मोठं घडणार? देवेंद्र फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट....
दिल्ली दौऱ्यामागचं गुपित काय?; फडणवीस-शिंदे-पवारांचा मुक्काम वाढला
दिल्ली दौऱ्यामागचं गुपित काय?; फडणवीस-शिंदे-पवारांचा मुक्काम वाढला.