AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: वैभव सूर्यवंशी पर्यावरणासाठी घातक! असं का म्हणाला आर अश्विन? जाणून घ्या लॉजिक

आयपीएल 2026 स्पर्धेत वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीचं सर्वत्र कौतुक होत आहे. वैभवने एलिमिनेटर सामन्यात तर कहर केला. अवघ्या 29 चेंडूत 97 धावांची आक्रमक खेळी केली. त्यामुळे समालोचन करणाऱ्या अश्विनने वैभव पर्यावरणासाठी घातक असल्याचं विधान केलं. असं करण्याचं कारण की...

IPL 2026: वैभव सूर्यवंशी पर्यावरणासाठी घातक! असं का म्हणाला आर अश्विन? जाणून घ्या लॉजिक
IPL 2026: वैभव सूर्यवंशी पर्यावरणासाठी घातक! असं का म्हणाला आर अश्विन? जाणून घ्या लॉजिकImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 28, 2026 | 5:03 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेत सर्वात चर्चेत नाव कोणाचं असेल तर ते 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीचं.. या खेळाडूने स्पर्धेत नवा पायंडा पाडला आहे. तसेच अनेक विक्रम धडाधड मोडत सुटला आहे. त्यामुळे वैभव सूर्यवंशीचा चाहता वर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. काल परवापर्यंत वैभवच्या फलंदाजीबाबत बोटं मोडणारेही आता त्याची स्तुती करताना दिसत आहेत. कारण वैभवची सातत्यपूर्ण कामगिरी सुरू आहे. त्यामुळे त्याच्या क्षमतेवर बोटं दाखवण्याची जागाच शिल्लक नाही. असं असताना माजी क्रिकेटपटू आर अश्विनने वैभव सूर्यवंशीची फलंदाजी पाहून एक विधान केलं आहे. वैभव सूर्यवंशी पर्यावरणासाठी घातक असल्याचं सांगितलं आहे. असं सांगण्याचं कारणंही आहे. वैभव सूर्यवंशी चेंडूवर आक्रमक प्रहार करतो आणि निर्धाव चेंडू सोडत नाही. त्यामुळे ग्रीन डॉट होत नाही आणि पर्यावरणाचं नुकसान होतं. कारण प्रत्येक निर्धाव चेंडूवर बीसीसीआय झाडं लावते.

आर अश्विनने मजेशीर अंदाजात सांगितलं की, वैभव सूर्यवंशी पर्यावरणासाठी चांगला नाही कारण तो डॉट बॉल देत नाही. बीसीसीआयने आयपीएलमध्ये डॉट बॉलसंदर्भात एक विशेष मोहीम सुरू केली आहे. प्रत्येक डॉट बॉलवर बीसीसीआय आणि आयपीएलचे टायटल स्पॉन्स टाटा मिळून देशाच्या विविध भागात शेकडो झाडं लावतात. बीसीसीआय या माध्यमातून पर्यावरणविषयक जनजागृती करत आहे. वैभव सूर्यवंशीसारखे फलंदाज चौकार आणि षटकार मारत सुटले तर निर्धाव चेंडू कमी होती आणि त्या तुलनेच कमी झाडं लावली जातील. हाच धागा पकडून आर अश्विनने विनोदी भाष्य केलं.

वैभव सूर्यवंशी मोठा विक्रम रचता रचता राहिला. 29व्या चेंडूवर विकेट पडली नसती आणि शतक पूर्ण झालं असतं तर त्याच्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला गेला असता. आतापर्यंत हा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने 30 चेंडूत शतक पूर्ण केलं होतं. तर वैभव सूर्यवंशीने 28 चेंडूत 97 धावा केल्या आणि 29व्या चेंडूवर विकेट पडली. असं असलं तरी त्याने ख्रिस गेलच्या 59 षटकारांचा विक्रम मोडीत काढला आहे. वैभव सूर्यवंशीने 243 च्या स्ट्राईक रेटने 680 धावा केल्या आहेत. यात 65 षटकार मारले आहेत. तर एक शतक झळकावलं आहे.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा