AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Weather Update : राज्यात हिवाळ्यात पावसाचा अनुभव, थंडीला लागणार ब्रेक, या भागांत पडणार पाऊस, आयएमडीचे अपडेट काय?

Maharashtra Weather Update : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तापमानात वाढ होऊन थंडीचा जोर कमी झाला आहे. राज्यात २५ आणि २६ डिसेंबरला ढगाळ वातावरण असणार आहे. त्यामुळे थंडीचा जोर ओसरणार आहे.

Maharashtra Weather Update : राज्यात हिवाळ्यात पावसाचा अनुभव, थंडीला लागणार ब्रेक, या भागांत पडणार पाऊस, आयएमडीचे अपडेट काय?
राज्यात थंडीचा जोर कमी होणार
| Updated on: Dec 24, 2024 | 12:01 PM
Share

Maharashtra Weather Update : राज्यात मागील आठवड्यात थंडी वाढली होती. आता या थंडीला ब्रेक लागला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील थंडी गेली आहे. परंतु पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. बंगालच्या उपसागरात आता कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे पूर्व-इशान्येकडे दाब वाढणार आहे. यामुळे राज्यांमध्ये पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. उत्तरेकडून येणारे थंड कोरडे वारे व अरबी समुद्रातून येणारी आर्द्र हवेमुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या काही भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता जेष्ठ हवामान तज्ज्ञ के.एस.होसाळीकर यांनी व्यक्त केली आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तापमानात वाढ होऊन थंडीचा जोर कमी झाला आहे. राज्यात २५ आणि २६ डिसेंबरला ढगाळ वातावरण असणार आहे. त्यामुळे थंडीचा जोर ओसरणार आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये तापमान वाढणार आहे. तसेच २६ ते २८ डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रातील काही भागांत पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यानंतर वर्षाअखेरीस म्हणजे सोमवार ३० डिसेंबरपासून राज्यात थंडी वाढणार आहे.

हलक्या पावसाचा अंदाज

राज्यात गेले काही दिवस कडाक्याची थंडी पडली होती. राज्यातील काही शहरांचे तापमान पाचे ते अंश सेल्सिअसपर्यंत घसरले होते. परंतु आता वातावरणात बदल झाला आहे. वातावरणातील हा बदल पश्चिमी विभोक्ष (वेस्टर्न डिस्टर्बन्स)मुळे होत आहे. त्यामुळेच २६ डिसेंबरपासून हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात सोमवारी २९ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात २८.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

थंडी कमी झाल्याने पर्यटनचा आनंद

आता सरत्या वर्षाचा शेवटचा आठवडा आहे. नाताळमुळे सलग सुट्ट्या मिळाल्या आहेत. त्यातच थंडीचा जोर कमी झाला आहे. त्यामुले अनेक जण सहकुटुंब पर्यटनासाठी बाहेर पडले आहेत. राज्यभरातील सर्वच पर्यटन स्थळावरती नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. कोल्हापूरमधील राधानगरी धरण परिसरात बोचऱ्या थंडीचा सामना करत पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटत असताना पाहायला मिळत आहेत.

असा आहे पावसाचा अंदाज

  • २६ डिसेंबर रोजी कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील दक्षिणेकडील तुरळक भाग
  • २७ डिसेंबर रोजी खानदेश (नाशिक विभाग), मध्य महाराष्ट्र (पुणे विभाग), उत्तर मराठवाडा, आणि पश्चिम विदर्भातील विविध ठिकाणी
  • २८ डिसेंबर रोजी खानदेश, मराठवाडा (प्रामुख्याने उत्तरेकडील जिल्हे) आणि विदर्भातील काही भागांमध्ये मेघ गर्जनेसह पावसाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे.

या भागातील शेतकऱ्यांनी या पुढील कृषी सल्ला आणि हवामानाच्या अंदाजांकडे लक्ष ठेवावे आणि त्यानुसार नियोजन करावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?.
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर.
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान.
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद.
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड.