Weather Update: ‘पुढचे 5 दिवस नो हवामानाचे इशारे’, IMD चा नवा ॲलर्ट

हवामान विभागाकडून पुढील पाच दिवसांसाठीचा पावसाचा अंदाज जारी करण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान विभागानं जारी केलेल्या नव्या अ‌ॅलर्ट नुसार राज्यातील कोणत्याही जिल्ह्यांना इशारा देण्यात आलेला नाही.

Weather Update: 'पुढचे 5 दिवस नो हवामानाचे इशारे', IMD चा नवा ॲलर्ट
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Aug 23, 2021 | 5:13 PM

मुंबई: हवामान विभागाकडून पुढील पाच दिवसांसाठीचा पावसाचा अंदाज जारी करण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान विभागानं जारी केलेल्या नव्या अ‌ॅलर्ट नुसार राज्यातील कोणत्याही जिल्ह्यांना इशारा देण्यात आलेला नाही. राज्यात पुढील पाच दिवस पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. पावसानं दडी मारल्यामुळं शेतकरी मात्र, अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यातील आजची पावसाची स्थिती कशी राहील?

हवामान विभागनं सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, जालना, नांदेड या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस तुरळक ठिकाणी होईल, असा अंदाज वर्तवला आहे. तर, राज्यात उर्वरित ठिकाणी कोणत्याही ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला नाही.

27 ऑगस्टपर्यंत पावसाची उघडीप?

प्रादेशिक हवामान विभागाच्या मुंबई विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार हा आठवडा कोरडा राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाचा अंदाज खरा ठरल्यास शेतकऱ्यांसमोर मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे. यंदाच्या मान्सूनमधील अनियमितता पिकांना नुकसानकारक ठरत असल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

लातूरमध्ये पावसाची हजेरी

बऱ्याच दिवसा नंतर लातूर जिल्ह्यातल्या कासार सिरसी आणि रेणापूर तालुक्यात दमदार पाऊस झाला आहे . शेतकरी बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पावसाची वाट पाहत होते. रेणापूर तालुक्यात सरासरी 150 मिमी पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पानगाव ,कारेपूर ,पोहरेगाव या भागात चांगला पाऊस झाल्याने सोयाबीनसह इतर पिकांना जीवदान मिळाले आहे. रेणा नदीवरील बंधाऱ्यातही मुबलक पाणी जमा झाले आहे . त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा करणारे शेतकरी आनंदी झाले आहेत.

चार दिवसाच्या विश्रांती भंडारा जिल्ह्यात पावसाची हजेरी

चार दिवसच्या विश्रांती नंतर भंडारा जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे . मागील चार दिवसा पासून जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली होती.पाऊस न आल्याने दमट वातावरण निर्माण झाले होते.आज जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस आल्याने दमट वातावरणा पासून नागरिकांना दिलासा आहे.

वाशिम तालुक्यातील वाळकी, दोडकी व तांदळी,पार्डी परीसरात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे.

इतर बातम्या:

मविआ सरकार आल्यापासून महाराष्ट्राला पणवती, दहीहंडीवरुन मनसेची आक्रमक भूमिका

पुण्यात शालाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या वाढली, जिल्ह्यात बालमजुरी वाढण्याचा धोका!

IMD Predicts there will be no rain during next four to five days in Maharashtra

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.