AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IMD Rain Alert : घाटमाथ्यावर धो-धो कोसळणार… महाराष्ट्रासह या राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा

IMD Rain Alert : हवामान विभागाच्या माहितीनुसार, 24 ऑगस्ट रोजी देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता आहे. कोणत्या भागात कसे हवामान असेल याबाबत माहिती जाणून घेऊयात.

IMD Rain Alert : घाटमाथ्यावर धो-धो कोसळणार... महाराष्ट्रासह या राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा
Maharashtra Ghat Rain Alert NewsImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 23, 2026 | 9:58 PM
Share

देशासह राज्यातील अनेक भागात पावसाच्या सरी कोसळताना पहायला मिळत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, 24 ऑगस्ट रोजी देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता आहे. उत्तर-पश्चिम भारतातील उत्तराखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशात पावसाचा जोर कायम राहील. दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील काही भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पूर्व भारतातील बिहार, झारखंड, ओडिशा आणि गंगेच्या पश्चिम बंगालमध्येही पावसाचा अंदाज आहे. तसेच महाराष्ट्रातील घाटमाथ्यावरही पाऊस पडण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

उत्तर प्रदेशात कसे असेल हवामान?

हवामान विभागाच्या माहितीनुसार, पूर्व उत्तर प्रदेशात 23 ते 25 ऑगस्टदरम्यान अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम उत्तर प्रदेशात तुलनेने कमी पाऊस पडू शकतो. राज्यात पावसासोबत ढगाळ वातावरण आणि काही भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

बिहारमध्ये पावसासोबत वीज कोसळण्याचा धोका

24 ऑगस्ट रोजी बिहारमध्ये हवामान विशेष सक्रिय राहण्याची शक्यता आहे. IMD ने 24 ते 26 ऑगस्टदरम्यान राज्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. सोमवारी बिहारच्या अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

दिल्लीत कसे असेल हवामान?

राजधानी दिल्लीत 24 ऑगस्ट रोजी साधारणपणे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. IMD च्या अंदाजानुसार सकाळपासून दुपारपर्यंत काही ठिकाणी अतिशय हलका ते हलका पाऊस पडू शकतो. संपूर्ण शहरात सातत्याने मुसळधार पाऊस होण्याची शक्यता कमी असली तरी स्थानिक पातळीवर पावसाच्या सरी पाहायला मिळू शकतात.

राजस्थानमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

24 ऑगस्ट रोजी राजस्थानात पावसाची शक्यता शक्यता आहे. पूर्व राजस्थानात 23 ते 26 ऑगस्टदरम्यान काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस आणि वीज पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जयपूर, अलवर, भरतपूर, दौसा आणि पूर्वेकडील आसपासच्या भागांत हवामानात बदल होऊ शकतो. राज्याच्या इतर भागांत पावसाची शक्यता तुलनेने कमी राहू शकते.

महाराष्ट्रासह दक्षिण आणि पश्चिम भारतातही पावसाची शक्यता

दक्षिण आणि पश्चिम भारतातील अनेक राज्यांमध्ये 24 ऑगस्ट रोजी पावसाचा प्रभाव कायम राहणार आहे. गोव्यात अनेक ठिकाणी पाऊस सुरू राहू शकतो.गुजरात, मराठवाडा, सौराष्ट्र आणि कच्छमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. दक्षिण भारतात किनारी आंध्र प्रदेश, तमिळनाडू-पुद्दुचेरी आणि तेलंगणातील काही भागांत मुसळधार पाऊस पडू शकतो. किनारी कर्नाटक, केरळ आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकातही पावसाच्या धारा कोसळण्याची शक्यता आहे.

Follow Us
जळगाव महापालिकेच्या महासभेत राडा! इब्राहीम पटेल यांच्या वक्तव्याने...
जळगाव महापालिकेच्या महासभेत राडा! इब्राहीम पटेल यांच्या वक्तव्याने भाजप-ठाकरे गट आमनेसामने, नगरसेवकांचा सभात्याग
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन फाईल्स'साठी आंदोलनाचा इशारा!
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल; थेट...
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना विधान भोवलं
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना सुरज चव्हाणांचा थेट इशारा
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला...
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला; संजय राऊतांवरही साधला निशाणा!
दुष्काळाचा मोठा फटका! धाराशिवमध्ये 600 एकरांवरील तुतीच्या बागा...
दुष्काळाचा मोठा फटका! धाराशिवमध्ये 600 एकरांवरील तुतीच्या बागा सुकल्या, रेशीम उत्पादक संकटात
राजकारणात येण्याची इच्छा नव्हती, पण लीडर बनायचं होतं; पंकजा मुंडेंनी..
राजकारणात येण्याची इच्छा नव्हती, पण लीडर बनायचं होतं; पंकजा मुंडेंनी सांगितली मनातील गोष्ट
महाराष्ट्रात एल निनोचा कहर! मोसंबीच्या बागा जळाल्या, कापूस उत्पादकही..
महाराष्ट्रात एल निनोचा कहर! मोसंबीच्या बागा जळाल्या, कापूस उत्पादकही संकटात; शेतकऱ्यांवर दुहेरी संकट
मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश, माढ्यात ऊसाला मिळणार प्रतिटन..
मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश, माढ्यात ऊसाला मिळणार प्रतिटन 3450 रुपये दर
संजय राऊतांवर सुनील तटकरेंचा हल्लाबोल; आधी स्वतःच्या पक्षातील खासदार..
संजय राऊतांवर सुनील तटकरेंचा हल्लाबोल; आधी स्वतःच्या पक्षातील खासदारांचा हिशोब द्या! नंतर...