IMD Weather Update : महाराष्ट्रावर घोंगावतंय मोठं संकट, पुढील 48 तास धोक्याचे, आयएमडीचा हाय अलर्ट

पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं महाराष्ट्रासह अनेक राज्यांना पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे, हवामान विभागाकडून अनेक राज्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

IMD Weather Update : महाराष्ट्रावर घोंगावतंय मोठं संकट, पुढील 48 तास धोक्याचे, आयएमडीचा हाय अलर्ट
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 04, 2025 | 9:40 PM

बंगालाच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, त्यामुळे पुढील चार दिवस देशभरात पावसाचा जोर वाढणारा असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील चार दिवस पाच ऑक्टोबर ते आठ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण उत्तर भारतात जोरदार पावसाची शक्यता आहे. वादळ आणि वि‍जांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आला आहे, हा मान्सूनचा या वर्षीचा शेवटचा पाऊस असू शकतो असंही हवामान खात्यानं म्हटलं आहे.

राजस्थानमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

दरम्यान याच काळात राजस्थानमध्ये देखील हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, राजस्थानमधील बिकानेर आणि जोधपूर या जिल्ह्यांसह काही जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. पुढील दोन दिवस राज्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील दोन दिवस संपूर्ण उत्तर भारतात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

बंगालमध्ये पावसाचा इशारा

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे, त्यामुळे पुढील तीन दिवस पश्चिम बंगालच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या अनेक जिल्ह्यांना पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा तडाखा बसणार असून, या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात काय स्थिती?

पुढील दोन दिवस महाराष्ट्रात देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या शक्ती चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात रविवारी मुसळधार पावसाची शक्यता आहे, या काळात वाऱ्याचा वेग देखील प्रचंड असणार आहे, त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचं आवाहान करण्यात आलं आहे, तसेच मच्छिमारांनी या काळात मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असा इशारा देखील देण्यात आला आहे. महाराष्ट्रात पावसामुळे आधीच मोठं नुकसान झालं आहे, त्यात आता पुन्हा एकदा हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे.