AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IMD Weather Update : पुढील 48 तास धोक्याचे, महाराष्ट्रासह 16 राज्यांना हायअलर्ट, आयएमडीच्या नव्या इशाऱ्यानं चिंता वाढली

भारतीय हवामान विभागाकडून पुढील दोन ते तीन दिवस उत्तर - पश्चिम भारत आणि पुढचे चार ते पाच दिवस मध्य भारतामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

IMD Weather Update : पुढील 48 तास धोक्याचे, महाराष्ट्रासह 16 राज्यांना हायअलर्ट, आयएमडीच्या नव्या इशाऱ्यानं चिंता वाढली
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 11, 2025 | 6:02 PM
Share

भारतीय हवामान विभागाकडून पुढील दोन ते तीन दिवस उत्तर – पश्चिम भारत आणि पुढचे चार ते पाच दिवस मध्य भारतामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आयएमडीनं दिलेल्या माहितीनुसार उत्तर-पश्चिम भारत आणि मध्य भारातामध्ये पुढील 48 ते 72 तास जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभू्मीवर हवामान विभागाकडू अनेक राज्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे, नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मध्य प्रदेश, हरियाणा, चंदीगढ, दिल्ली, हिमाचल प्रदेश, जम्मू, पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर दुसरीकडे छत्तीसगढ, तटीय कर्नाटक, पूर्व उत्तर प्रदेश, झारखंड, महाराष्ट्र, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपूरा, ओडिशा राजस्थान, उत्तराखंड या राज्यांमध्ये देखील अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पुढील 48 तास धोक्याचे

भारतीय हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील 48 ते 72 तासांमध्ये अनेक राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या राज्यांसाठी पावसाचा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातही अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता आहे.

महाराष्ट्रात काय स्थिती?

महाराष्ट्रातही हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, कोकणातील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर विदर्भातही हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यात देखील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.

दरम्यान गेले काही दिवस राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे, विदर्भात मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे अनेक भागांमध्ये मोठं नुकसान झालं आहे. नागपूर जिल्ह्याला पावसाचा चांगलाच फटका बसला, दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी घुसल्याचं पाहायला मिळालं. तर गडचिरोली जिल्ह्यात तब्बल सहा तालुक्यांचा जिल्हा मुख्यालयाशी संर्पत तुटला होता. आता पुन्हा एकदा विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  मध्य महाराष्ट्रात देखील पावसाची शक्यता आहे.

Follow Us
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे