महायुतीच्या समन्वय समितीची आज वर्षावर महत्त्वाची बैठक, महामंडळाच्या अंतिम वाटपावर चर्चा

महायुतीच्या समन्वय समितीची महत्त्वाची बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी पार पडणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे हे उपस्थित असणार आहेत.

महायुतीच्या समन्वय समितीची आज वर्षावर महत्त्वाची बैठक, महामंडळाच्या अंतिम वाटपावर चर्चा
महायुती
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 24, 2026 | 10:48 AM

मोठी बातमी समोर येत आहे, आज महायुतीच्या समन्वय समितीची वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळी सात वाजता मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित असणार आहेत, तसेच या बैठकीला समन्वय समितीचे इतर सदस्य देखील उपस्थित राहणार आहेत. दरम्यान या बैठकीमध्ये महामंडळाच्या अंतिम वाटपावर चर्चा होणार असल्याने या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. महामंडळाबाबत काय निर्णय होणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बैठकीमध्ये नेमकी कशावर चर्चा? 

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक होणार आहे. आज संध्याकाळी सात वाजता ही बैठक होणार असून, या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती असणार आहे, या तीन्ही नेत्यांसोबतच महायुतीच्या समन्वय समितीमधील इतरही सदस्य या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये महामंडळाचे अंतिम वाटप, जिल्हा पातळीवरील समित्यांचे वाटप, राज्यपाल नियुक्त पाच जांगासंदर्भात चर्चा तसे इतर काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. दरम्यान आता या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय होणार? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आज  सायंकाळी महायुतीच्या समन्वय समितीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. महायुती समन्वय समितीतून अंतिम निर्णय झाल्यानंतर आता वरिष्ठांच्या बैठकीत अंतिम यादीवर शिक्कामोर्तब होणार  का? हे बघणं महत्त्वाचं असेल. महामंडळाचे अंतिम वाटप, जिल्हा पातळीवरील समित्यांचे वाटप, तसेच राज्यपाल नियुक्त पाच जांगासंदर्भात ही बैठक महत्त्वाची आहे. या बैठकीला महायुतीमधील राज्यातील तीनही वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. या सर्व विषयांवर एकमत होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us