AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार याचं मोठं विधान, ‘धाडस केलं पाणी सोडलं, धाडस वाया जात नाही’

मी सध्या शांत बसतोय. डोक्यावर बर्फ ठेवून बघायचं. ऐकत रहायचं, अशा शब्दात अजित पवार यांनी खडसावल आहे. बारामती येथे त्यांनी एका सभेत बोलताना एक मोठं विधान केलय. मी जेव्हा धाडस करतो ते कधीच वाया जात नाही, असे ते म्हणालेत.

अजित पवार याचं मोठं विधान, 'धाडस केलं पाणी सोडलं, धाडस वाया जात नाही'
DCM Ajit Pawar VS LOP Vijay WadettiwarImage Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Sep 23, 2023 | 6:09 PM
Share

बारामती : 23 सप्टेंबर 2023 | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बारामती सहकारी बॅंकेची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या सभेत बोलताना अजितदादा यांनी तुफान फटकेबाजी केली. मी सत्तेत असो वा नसो. मी सहकारातून पुढे आलोय. त्यामुळे पारदर्शक आणि दुजाभाव न करता सहकारात काम व्हावं हा माझा आग्रह आहे, असे ते म्हणाले. आपली अर्थव्यवस्था आता जगात पहिल्या १० देशात आहे. ती आता पहिल्या पाचमध्ये आली पाहिजे यासाठी पंतप्रधानांचे प्रयत्न सुरु आहेत. आपण जपान आणि जर्मनीलाही मागे टाकू शकतो. त्यासाठी सगळ्यांनी परिश्रम घ्यावे लागतील. प्रत्येकाला योगदान द्याव् लागेल. यात बॅंकांचीही भुमिका महत्वाची राहील, असे अजितदादांनी सांगितले.

सारथी, बार्टी अशा सर्व समाजासाठी असलेल्या योजनातून सगळ्यांना मदत व्हावी ही भूमिका आहे. जात, पात न मानणारा मी कार्यकर्ता आहे. सगळ्यांनी एकोप्याने, गुण्यागोविंदानं राहावं. सर्वांनाच मदत झाली पाहिजे ही भूमिका आहे. लोक बारामती या नावावर विश्वास ठेवतात. बॅंकेचं काम लोकाभिमुख आणि पारदर्शक व्हायला हवं असे त्यांनी बजावले.

बॅंकेत अनेकजण काम करतात. पण, काही जण बदली करा म्हणतात. अडचण प्रत्येकाला असते. मलाही आहे म्हणून बदली मागणं योग्य आहे का? आपल्याकडे इथे जागा शिल्लक नाहीत आणि कुणी दबाव आणलाच तर मग शाखा असेल तिथलेच लोक भरती करेन. मग, बदलीचा प्रश्न येणार नाही. विनाकारण दबाव आणू नका. जरा सबुरीने घ्या, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

मी सध्या शांत बसतोय

अनेक राष्ट्रीयकृत बॅंका विलीन झाल्या. अनेक सहकारी बॅंकांची अवस्था दयनीय आहे. कर्ज प्रकरण करताना कठोर भुमिका न घेतल्यामुळे बॅंका अडचणीत आल्या. शेवटच्या माणसापर्यंत लाभ मिळावा हा माझा प्रयत्न आहे. तसेच, वन टाईम सेटलमेंट करण्याचा बॅंकाना कायमचा अधिकार नाही. मी सध्या शांत बसतोय. डोक्यावर बर्फ ठेवून बघायचं. ऐकत रहायचं. सारखंच सेटलमेंट केली तर बॅंका चालणार नाहीत. काही बॅंकांचे चेअरमन अजूनही येरवड्यात आहेत, असा टोलाही दादांनी यावेळी लगावला.

अजित पवार असला तरी सगळ्यांना समान न्याय

आरबीआय बॅंकेकडून अनेक निर्बंध आले आहेत. त्यामुळे नियमाचे पालन करा. जाचक अटी असतील तर रिझर्व्ह बॅंकेकडे जाऊ. कर्ज वसुली करताना कठोर भुमिका घ्या. उद्या अजित पवार असला तरी सगळ्यांना समान न्याय आहे. कर्जपुरवठा करताना चुकीचं केलं तर कर्जदारासह संबंधित बॅंक अधिकाऱ्यांवरही कारवाई होवू शकते, असे त्यांनी सांगितले.

आर्थिक राजधानी म्हणून मुंबईकडे पाहिलं जातं. सर्वाधिक कर आपल्या मुंबईतून जातो. कर्जदार कर्ज भरत नाही. त्याचा भुर्दंड जामिनदाराला बसतो. कर्ज फेडणारा नसेल तर जामिनदार म्हणून सह्याच करु नका.

मी सरकारमध्ये नसतो तर निरा डाव्या आणि उजव्या कालव्याला पाणी सोडलं नसतं. धाडस केलं म्हणून पाणी सोडलं. सुदैवाने मी जेव्हा धाडस करतो ते कधीच वाया जात नाही. पाणी असताना ते अजित पवार देणार नाही असं होवू शकतं का? समन्यायी पद्धतीने पाणी वाटप होतंय. थोडा दम धरा असे अजित पवार म्हणाले.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.