कोल्हापुरात अधिकाऱ्याचं वाजत गाजत स्वागत, व्हायरल VIDEO ची रंगली चर्चा

सहाय्यक आयुक्त म्हणून बदली झालेल्या विशाल लोंढे यांच्या कार्यालयातील कर्मचारी आणि सहकाऱ्यांनी असं जंगी स्वागत केलं जे पाहून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल.

कोल्हापुरात अधिकाऱ्याचं वाजत गाजत स्वागत, व्हायरल VIDEO ची रंगली चर्चा
Follow us
| Updated on: Jan 05, 2021 | 6:36 PM

कोल्हापूर : बँड बाजा आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत तुम्ही एखाद्या अधिकाऱ्यांचं स्वागत होताना पाहिलंच असेल. असाच एक प्रकार कोल्हापूरच्या समाजकल्याण विभाग कार्यालयात समोर आला आहे. सहाय्यक आयुक्त म्हणून बदली झालेल्या विशाल लोंढे यांच्या कार्यालयातील कर्मचारी आणि सहकाऱ्यांनी असं जंगी स्वागत केलं जे पाहून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल. या स्वागताचे व्हीडिओ सध्या सोशल मीडियात चांगलेच व्हायरल होत आहेत. (In Kolhapur the officer was greeted with band and dance VIDEO viral)

एखाद्या शासकीय अधिकाऱ्यांसाठी बदली आणि नवी नियुक्ती ही सामान्य बाब आहे. मात्र, सरकारचे काही असे विशेष विभाग आहेत. जिथल्या बदल्या आणि नियुक्त्या चर्चेत येत असतात. कोल्हापूरच्या समाज कल्याण विभागात सहाय्यक आयुक्त असलेल्या बाळासाहेब कांबळे यांची बदली झाली आणि त्या ठिकाणी आणि विशाल लोंढे या नव्या अधिकार्‍याची नियुक्ती झाली. याआधीही प्रभारी विशाल लोंढे यांच्या नियुक्तीने कार्यालयातील त्यांच्या सहकारी आणि कर्मचाऱ्यांसह काही संघटनांना भलताच आनंद झाला आणि त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि बँड बाजा वाजवत लोंढे यांचे स्वागत केलं.

डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेलं हे जंगी स्वागत सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतं आहे. मुळात या सर्वच बदल्या वादग्रस्त असल्याची चर्चादेखील आता रंगू लागली आहे. याचं कारण म्हणजे समाजकल्याण विभागात झालेला साखर घोटाळा, ट्रॅक्टर वाटप घोटाळा. या बहुचर्चित घोटाळ्यांची सध्या चौकशी सुरू आहे. ज्यात अर्धा डझन पेक्षाही जास्त अधिकारी दोषी आढळले असून कोणत्याही क्षणी त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.

अशी परिस्थिती असताना नव्या अधिकाऱ्याचं झालेले जंगी स्वागत भुवया उंचावणारा आहे. सरकारी अधिकारी असे मिरवणुकीने येऊ लागले, कार्यालयांमध्ये गटाचे तटाचे राजकारण होऊ लागले तर जिल्ह्यातील सर्व सामान्य लोकांना न्याय देऊ शकतील का? ज्या तत्परतेने अधिकाऱ्यांचे स्वागत झालं त्याच तत्परतेने लोकांची काम होणार का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

फटाके उडवून, बँडबाजाच्या तालावर अधिकाऱ्याला खांद्यावर घेऊन नाचण्याचा हा प्रकार काही अतिउत्साही कर्मचाऱ्यांनी मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला. अजाणतेपणी तो फॉरवर्डही केला गेला. नंतर मात्र, या प्रकाराची चर्चा सुरू होताच हे व्हीडिओ डिलीट करण्याची देखील धावाधाव सुरू झाली. पण तोपर्यंत विभागाशी संबंधित अनेक जणांपर्यंत हा व्हिडीओ पोहोचला होता. (In Kolhapur the officer was greeted with band and dance VIDEO viral)

संबंधित बातम्या –

पोलिसांनी वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग दाखवू; मनसेचा थेट इशारा

औरंगाबादची बस आडवून संभाजीनगरचा बोर्ड, आता रेल्वे स्टेशनची सुरक्षा वाढवली

(In Kolhapur the officer was greeted with band and dance VIDEO viral)

Non Stop LIVE Update
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.