AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NashikGold: उठा उठा दिवाळी आली, दागिने खरेदीची वेळ झाली; सोने 700 तर चांदी 2 हजारांनी स्वस्त!

नाशिकच्या सराफा बाजारात बुधवारी सोने जवळपास 700 रुपयांनी, तर चांदी 2 हजारांनी स्वस्त झाली. 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 47 हजार 500 रुपये नोंदवले गेले.

NashikGold: उठा उठा दिवाळी आली, दागिने खरेदीची वेळ झाली; सोने 700 तर चांदी 2 हजारांनी स्वस्त!
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: | Updated on: Nov 03, 2021 | 1:21 PM
Share

नाशिकः नाशिकच्या सराफा बाजारात बुधवारी सोने जवळपास 700 रुपयांनी, तर चांदी 2 हजारांनी स्वस्त झाली. 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 47 हजार 500 रुपये नोंदवले गेले, अशी माहिती दी नाशिक सराफा असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे यांनी दिली.

सध्या दिवाळीनिमित्त नाशिकच्या सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याला मागणी वाढली आहे. धनत्रयोदशी दिवशी काल मंगळवारी अंदाजे पन्नास कोटींची उलाढाल झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आतापर्यंत ही सर्वात चांगली उलाढाल झाल्याचे समजते. दरम्यान सोन्याचे भाव सध्या स्वस्त होताना दिसत आहेत. नाशिकमध्ये 1 सप्टेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याचे दर 48,810, तर बावीस कॅरेट सोन्याचे दर हे 45,590 होते. त्या नंतर या दरात घसरणच पाहायला मिळाली. सराफा बाजारात वसुबारसेच्या दिवशी सोमवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 48000 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 46500 रुपये नोंदवले, तर चांदीचे दर किलोमागे 65000 रुपये नोंदवले गेले. धनत्रयोदशी दिवशी मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 48 हजार 200 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 46 हजार 900 रुपये आणि चांदीचे दर किलोमागे 65 हजार 500 रुपये नोंदवले गेले. बुधवारी सोन्याचे भाव जवळपास 700 रुपयांनी स्वस्त झाले. 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 47 हजार 500 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 46 हजार 300 रुपये नोंदवले गेले. चांदीमध्ये जवळपास दोन हजारांनी घसरण झाली. किलोमागे चांदीचे दर 63 हजार 500 रुपये नोंदवले गेले , अशी माहिती दी नाशिक सराफा असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे यांनी दिली. शिवाय सायंकाळपर्यंत बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल होईल, असा अंदाज त्यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना व्यक्त केला.

पुढच्या काही वर्षांत सोन्याच्या किमती आभाळाला टेकणार असल्याचा असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. एचडीएफसी सिक्योरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, पुढच्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून देण्यात आले आहेत. याच काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर प्रतिऔंस 3000 ते 5000 डॉलर्स इतका असू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

नाशिकमध्ये बुधवारी सोन्याचे भाव जवळपास 700 रुपयांनी, तर चांदी दोन हजारांनी स्वस्त झाली. 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 47 हजार 500 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 46 हजार 300 रुपये नोंदवले गेले. – गिरीश नवसे, अध्यक्ष, दी नाशिक सराफा असोसिएशन

इतर बातम्याः

Special Report: तुझं हसणं माझ्या जगण्याची भाकरीय; जगात सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या एका मुलखावेगळ्या कवीची गोष्ट!

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची शिवसेना आमदार कांदेच्या घरी भेट; नाशिकमध्ये नाना अटकळींसह शिष्टाईच्या चर्चेला उधाण

बईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
बईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....