AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोल्डन चान्सः भाव वाढतील बरं, करा खरेदी पटापट; जाणून घ्या नाशिक सराफातील भाव

नाशिकच्या (Nashik) सराफा बाजार पेठेत शनिवारी सोने (gold) पुन्हा स्वस्त झाले. 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 46200 रुपये नोंदवले गेले.

गोल्डन चान्सः भाव वाढतील बरं, करा खरेदी पटापट; जाणून घ्या नाशिक सराफातील भाव
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: मनोज कुलकर्णी | Updated on: Sep 25, 2021 | 1:36 PM
Share

नाशिकः नाशिकच्या (Nashik) सराफा बाजार पेठेत शनिवारी सोने (gold) पुन्हा स्वस्त झाले. 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 46200 रुपये नोंदवले गेले. (In Nashik bullion market, the price of 24 carat gold is Rs 46,200 per 10 grams)

सोन्याचे अलंकार बहुतेक जणांना आवडतात. आता गुंतवणूकही म्हणून तरुण वर्गाचा सोन्याकडे ओढा वाढला आहे. नाशिकच्या सराफा बाजारात गुरुवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 46600 रुपये नोंदवले गेले. बुधवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 46900 रुपये होते. तर शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 46200 रुपये नोंदवले गेले. बुधवारच्या तुलनेत या दरामध्ये जवळपास 700 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. 22 कॅरेट सोन्याचे दर गुरुवारी 45250 होते. हेच दर बुधवारी 10 ग्रॅममागे 45500, शुक्रवारी 45000, तर शनिवारी दर 44900 होते. बुधवारच्या तुलनेत या दरात 400 रुपयांची वाढ झालेली दिसली. गुरुवारी चांदीचे दर किलोमागे 61200 होते. विशेष म्हणजे बुधवारीही हेच दर कायम होते. शुक्रवारी या दरातही घसरण पहायला मिळाली असून, ते 60800 व स्थिरावले. शनिवारी त्यात पुन्हा घसरण होऊन ते 60500 वर थांबले. सोन्या-चांदीच्या या दरावर तीन टक्के जीएसटी लागू असेल. आता सोने व्यापारी अगदी 2 लाखांपर्यंतच्या रोखीच्या व्यवहारांसाठीही KYC ची मागणी करत आहेत. तसेच दोन लाखांपेक्षा कमी रकमेच्या व्यवहारासाठी ग्राहकांकडून पॅनकार्ड मागितले जात आहे. जेणेकरून आपल्याला भविष्यात ईडीच्या कारवाईला सामोरे जावे लागणार नाही, याची काळजी सराफा व्यापारी घेत आहेत.

पुन्हा उसळी घेणार

पुढच्या काही वर्षांत सोन्याच्या किंमती आभाळाला टेकणार असल्याचा असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. HDFC सिक्योरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, पुढच्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून देण्यात आले आहेत. याच काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर प्रतिऔंस 3000 ते 5000 डॉलर्स इतका असू शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमवीर अनेक देशांमध्ये आर्थिक पॅकेजेस दिली जात आहेत. मात्र, त्यामुळे मध्यवर्ती बँकांची अवस्था बिकट होऊ शकते. परिणामी आगामी काळात सोन्याचे दर अक्षरश: गगनाला भिडू शकतात, असे क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून सांगण्यात आले आहे.

‘गुगल पे’वर ठेवा साठवून

सोने खरेदी करण्यासाठी आता तुम्हाला दुकानात जाण्याची गरज नाही. कारण आपण दररोज पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरत असलेल्या ‘गुगल पे’ वरुनही आता सोनं खरेदी करता येईल. एवढेच नव्हे तर ‘गुगल पे’वर सोने साठवून ठेवण्याचीही सुविधा असेल. त्यामुळे तुम्हाला घरात सोनं ठेवण्याची जोखीमही पत्कारावी लागणार नाही.

नाशिकच्या सराफा बाजार पेठेत आज 24 कॅरेट सोन्याचा दर दहा ग्रॅममागे 46200 रुपये आहे. 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 44900 आहे. चांदीचे दर किलोमागे 60500 रुपये आहे. – गिरीश नेवासे, अध्यक्ष, द नाशिक सराफा असोसिएशन (In Nashik bullion market, the price of 24 carat gold is Rs 46,200 per 10 grams)

इतर बातम्याः

भाजप विरुद्ध भाजप; महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये रंगला सामना

नाशिककरांना मिळणार नवी घरे; जुन्या इमारतींचा होणार पुनर्विकास, नगरविकास खाते राजी

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?