Devendra Fadnavis : आपण पेट्रोल-डिझेलसाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून आहोत, पण 2030 पर्यंत..पुण्यातून देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य

Devendra Fadnavis : पुण्यात भाजपच्या कार्यकारिणीची बैठक होत आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केलं. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी पेट्रोल-डिझेल संदर्भात एक मोठं वक्तव्य केलं.

Devendra Fadnavis : आपण पेट्रोल-डिझेलसाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून आहोत, पण 2030 पर्यंत..पुण्यातून देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis
| Updated on: Aug 31, 2026 | 5:10 PM

भाजपच्या कार्यकारिणीची पुण्यात आज महत्वाची बैठक होत आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी पेट्रोल-डिझेल संदर्भात मोठं वक्तव्य केलं. “भारत आज पेट्रोल-डिझेलसाठी पूर्णपणे दुसऱ्या देशांवर अवलंबून आहे. आज आपलं पेट्रोल-डिझेलसाठी अवलंबित्व आहे. मला विश्वास आहे, 2030 पर्यंत पेट्रोल-डिझेलची 50 टक्के गरज शेतकरी भागवेल आणि 50 टक्के गरज EV च्या माध्यमातून भागवली जाईल” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. “भारत आत्मनिर्भरतेकडे चालला आहे. आत्मनिर्भरतेकडे जाणारा हा भारत जगातल्या काही शक्तींना आवडत नाहीय. भारताला आज रोखलं नाही, तर यापुढे रोखता येणार नाही. म्हणून त्यांनी कार्यपद्धती बदलली आहे. आज ज्यांचा उपयोग होतोय, त्यांच्यापैकी 5 टक्के लोकांना माहितीय आपला उपयोग होतोय. ते जाणीवपूर्वक अशा शक्तींना साथ देत आहेत” असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

“आपल्याला छत्रपती शिवरायांनी लढायला शिकवलं. शिवरायांची सेना उतरली की एकच नारा द्यायची हर हर महादेव. आता तशाच प्रकारची चढाई करण्याची वेळ पुन्हा एकदा येतेय. हे आक्रमक नवीन नाहीत. आक्रमण करणारे नवीन नाहीत. विषय पण नवीन नाही. त्यांची कार्यपद्धती बदललेली आहे” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले.

विरोधक नव्या कार्यपद्धतीचा अवलंब करतायत

“ही कार्यपद्धती समजून घेण्याची आवश्यकता आहे.आपल्याला माहितीय जेव्हा-जेव्हा शत्रुने वेगवेगळ्या पद्धतीने स्वराज्यावर हल्ले केले, त्या त्यावेळी शिवरायांनी देखील गनिमीकाव्यापासून गुप्तहेराचा वापर करुन शत्रुचा नायनाट केला. मी विरोधकांना शत्रू म्हणणार नाही. विरोधक नव्या कार्यपद्धतीचा अवलंब करतायत. ती समजून घ्यावी लागेल” असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.  “पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताची जी घोडदौड चालू आहे, जगातली चौथी अर्थव्यवस्था म्हणून भारत तयार झाला आहे असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. आत्मनिर्भरतेकडे आपण जातोय. शस्त्रांसाठी भारताला कोणावर अवलंबून रहावं लागत नाही” असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Follow Us