AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शीतल म्हात्रे यांचे ‘ते’ प्रकरण आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची चौकशी… नितेश राणे यांची मागणी काय ?

कोणाच्या आदेशावर हे सगळे कार्यकर्ते काम करत आहेत. युवासेनाचे प्रमुख कोण आहेत ? माथाडी संघटनेचे प्रमुख कोण आहेत ? कोण या सगळ्या तरुणांना आदेश देत आहे ?

शीतल म्हात्रे यांचे 'ते' प्रकरण आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची चौकशी... नितेश राणे यांची मागणी काय ?
ADITYA THACKAREY AND SHITAL MHATREImage Credit source: TV9 NETWORK
| Updated on: Mar 15, 2023 | 5:51 PM
Share

मुंबई : शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे आणि नगरसेविका शीतल म्हात्रे यांच्या ‘त्या’ मॉर्फ व्हिडिओवरून भाजप आमदार नितेश राणे यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. या घटनेला दोन दिवस उलटून गेल्यानंतरही त्याचे पडसाद अजूनही विधानसभेत उमटत आहेत. शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करत शीतल म्हात्रे यांचा दोन तरुणांनी पाठलाग केला. त्याची तक्रार दाखल झाल्यानंतर दोन तरुणांना अटक केली. पण, या घटनेमागे असणारे मुख्य आरोपी कोण आहेत ते शोधून काढावेत अशी मागणी केली.

एका भगिनींच्या फोटोंची छेडछाड करून त्यांना बदनाम करण्याचा कट रचला. त्यानंतर पोलिसांनी योग्य कारवाई करून विशाखा राऊत यांचे जावई साईनाथ दुर्गे यांना अटक केली. पण, केवळ त्यांना अटक करून चालणार नाही. ही प्रचंड मोठी साखळी आहे. महिलांना बदनाम करने हा एक मोठा उद्योग झाला आहे. दुर्गे यांना अटक झाल्यानंतरही शितल म्हात्रे यांचा दोन तरुणांनी पाठलाग केला.

म्हात्रे यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी योग्य कारवाई करून दोन तरुणांना पकडले. हे तरुण सिद्धी विनायक मंदिरामध्ये कंत्राटी कामगार आहेत. त्यांना त्या विभागाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांनी नोकरीवर लावले आहे. मनसेचे संदीप देशपांडे यांच्यावरही हल्ला झाला तो भारतीय माथाडी सेनेचे कर्मचारी यांनी केला. तर, काल पाठलाग करणारे भारतीय युवा सेनेचे कार्यकर्ते आहेत.

जी बेरोजगार मुले आहेत त्यांना कंत्राटी नोकरीला कामाला लावायचे आणि त्यांच्या माध्यमातून असे गुन्हे करायला लावायची अशी प्रवृत्ती वाढीस लागली आहे. अशा प्रवृत्तीवर योग्य कारवाई करावी आणि त्यांना समज द्यावी असे आमदार सदा सरवणकर म्हणाले.

हाच धागा पकडत भाजप आमदार नितेश राणे यांनी थेट आदित्य ठाकरे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. दोन-तीन दिवसापासून सातत्याने हे प्रकरण चर्चेत आहे. काही कार्यकर्ते पकडले गेले. पण, या प्रकरणाच्या मास्टर माईंडकडे आपण लक्ष घालणार आहोत का ? असा सवाल त्यांनी केला.

कोणाच्या आदेशावर हे सगळे कार्यकर्ते काम करत आहेत. युवासेनाचे प्रमुख कोण आहेत ? माथाडी संघटनेचे प्रमुख कोण आहेत ? कोण या सगळ्या तरुणांना आदेश देत आहे ? तरुणांना अटक होते. आपण नेहमी या खालच्या तरुणांना अटक करत बसणार का ? हे जे कोणी युवासेनेचे प्रमुख आहेत त्यांना चौकशीला बोलवा. माथाडी संघटनेचे जे प्रमुख आहेत त्यांची चौकशी करा अशी मागणी करत नितेश राणे यांनी थेट आदित्य ठाकरे यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.