दुपारी म्हणाले जेवताना आणि झोपतानाच मास्क काढतो, मावळमध्ये अजित पवारांनी काय केलं?

अजित पवार यांचे भाषण सुरू होण्याआधी आमदार सुनील शेळके माईकजवळ येत दादा सगळे हट्ट पुरवले, आता फक्त मास्क काढून बोला, अशी विनंती त्यांनी केली अन् त्यांच्या विनंतीला मान देत अजित पवारदेखील मास्क काढून भाषणासाठी उभे राहिले.

दुपारी म्हणाले जेवताना आणि झोपतानाच मास्क काढतो, मावळमध्ये अजित पवारांनी काय केलं?
ajit pawar
Follow us
| Updated on: Oct 20, 2021 | 9:53 PM

पुणेः देशासह राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून, दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचं प्रमाण कमी होत आहे. परंतु अजूनही ठाकरे सरकारकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळण्याचा वारंवार सूचना देण्यात येत आहेत. तसेच कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवारांचं एक वक्तव्य चर्चेत आलंय. फक्त जेवताना आणि झोपताना मास्क काढतो असे वक्तव्य केले होते, मात्र त्या वक्तव्याचाच विसर अजित पवार यांना पडलेला दिसत आहे.

…अन् त्यांच्या विनंतीला मान देत अजित पवारांनी मास्क काढला

मावळ तालुक्यातील विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. अजित पवार यांचे भाषण सुरू होण्याआधी आमदार सुनील शेळके माईकजवळ येत दादा सगळे हट्ट पुरवले, आता फक्त मास्क काढून बोला, अशी विनंती त्यांनी केली अन् त्यांच्या विनंतीला मान देत अजित पवारदेखील मास्क काढून भाषणासाठी उभे राहिले. त्यामुळे उपस्थितांसाठी हा चर्चेचा विषय ठरलाय. रोज नवनवीन गोष्ट शिकायचा प्रयत्न केला पाहिजे, लाज वाटली नाही पाहिजे, शरद पवार 80 वर्षाचे झाले तरी ते नवीन काय गोष्ट असले तर तेसुद्धा पाहतात, असंही अजित पवार म्हणालेत.

अजित पवारांच्या नातेवाईकांवर धाडी का?

धाडीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकार तसेच भाजपवर चांगलाच निशाणा साधला. तसेच अजित पवार यांच्या कुटुंबीयांना का त्रास दिला जातोय याचं नेमकं कारण सांगितलं आहे. “राज्य सरकारमधील अनेकांना त्रास दिला. पण काही होत नाही हे पाहिल्यावर जरा मोठ्याला हात घालू म्हणून अजित पवार यांच्या कुटुंबियांवर धाडी टाकण्यात आल्या. पण ईडी वगैरे काहीही येऊद्या पण सरकार पडणार नाही,” असे शरद पवार म्हणाले. शरद पवार आज पिंपरी चिंचवडमध्ये एका सभेत बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी ईडी, आयकर विभाग तसेच सीबीायच्या धाडसत्रावर भाष्य केलं. “आधी ईडी, सीबीआय तसेच आयकर विभागाच्या माध्यमातून इतरांना त्रास दिला. आता अजित पवार यांच्या बहिणींना त्रास दिला जात आहे. केंद्र सरकारच्या सर्व यंत्रणा राज्य सरकारला त्रास देण्यासाठी काम करत आहेत. राज्य सरकारमधील अनेकांना त्रास दिला. पण काही होत नाही हे समजल्यावर जरा मोठ्याला हात घालू म्हणून अजित पवार यांच्या कुटुंबियांवर धाडी टाकण्यात आल्या. पण ईडी वगैरे काहीही येऊ द्या. हे सरकार पडणार नाही,” असे शरद पवार यांनी ठणकावून सांगितले.

इतर बातम्या :

‘देशावर भाजप म्हणून जे संकट आलंय ते दूर करायचं आहे’, शरद पवारांनी पिंपरी-चिंचवडमधून रणशिंग फुंकलं

देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा झटका! माजी खासदार, आमदाराची काँग्रेसमध्ये घरवापसी!

In the afternoon, he said that he removes the mask while eating and sleeping. What did Ajit Pawar do in Maval?

Non Stop LIVE Update
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.