AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सुरुवात तुम्ही केली शेवट मी करणार’, आयकर छाप्यातून राजकीय वॉरचे संकेत, रामराजे यांचे कोणाला आव्हान?

Ramraje Naik Nimbalkar : विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीव राजे निंबाळकर यांच्या घरावरती आयकर विभागाने पाच दिवस छापा टाकला होता. ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांच्या घर आणि कार्यालयांवर हा छापा पडला.

'सुरुवात तुम्ही केली शेवट मी करणार', आयकर छाप्यातून राजकीय वॉरचे संकेत, रामराजे यांचे कोणाला आव्हान?
| Updated on: Feb 10, 2025 | 2:04 PM
Share

Ramraje Naik Nimbalkar : सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, फलटण तालुक्यातील दिग्गज नेते, रामराजे नाईक यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांची आयकर विभागाकडून सुरू असलेली चौकशी अखेर पाचव्या दिवशी रविवारी संपली. त्यानंतर सोमवारी या प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. त्याला कारण रामराजे नाईक निंबाळकर यांनी ठेवलेले व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस आहे. केवळ 16 शब्दांचे त्यांचे हे स्टेटस राज्यात राजकीय चर्चेचा विषय बनला आहे.

माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीव राजे नाईक निंबाळकर यांची पाच दिवसानंतर आयकर विभागाची चौकशी पूर्ण झाली. त्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसची खूप चर्चा होऊ लागली आहे. “सुरुवात तुम्ही केली आहे शेवट मी करणार” अशा आशयाचा हा स्टेटस आहे. यामाध्यमातून त्यांनी माजी खासदार रणजीत नाईक निंबाळकर यांच्यावर नाव न घेता निशाणा साधल्याचा म्हटले जात आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स नंतर पुन्हा एकदा जयकुमार गोरे, रणजित निंबाळकर विरुद्ध रामराजे नाईक निंबाळकर वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

संजीव राजे नाईक निंबाळकर यांनी काय म्हटले…

आयकर विभागाच्या पाच दिवसांच्या छाप्यामध्ये काहीही निष्पन्न झाले नाही असे संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी म्हटले आहे. आयकर विभागाच्या छापेमारीत फक्त दोन लाख 35 हजार रुपयांची रोख रक्कम सापडली. ती रक्कम देखील आयकर विभागाने परत केल्याचे संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीव राजे निंबाळकर यांच्या घरावरती आयकर विभागाने पाच दिवस छापा टाकला होता. ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांच्या घर आणि कार्यालयांवर हा छापा पडला. या छापेमारी काही निष्पन्न झाले नाही, असा दावा संजीवराजे निंबाळकर यांनी केला.

आयकर विभागाकडून झालेली ही तपासणी राजकीय दृष्ट्या नाही. आयकर विभागाच्या तपासणी दरम्यान कार्यकर्त्यांनी देखील निवासस्थानी येऊन प्रेम दाखवले. याबद्दल संजीव राजे नाईक निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले.

कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.