राज्यावर मोठं संकट, थेट अवकाळी पावसाचा इशारा, 24 तास धोक्याची, तब्बल 8 राज्यात…

Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा जाही केला. पुढील काही तास अवकाळी पाऊस होण्याचे संकेत आहेत.

राज्यावर मोठं संकट, थेट अवकाळी पावसाचा इशारा, 24 तास धोक्याची, तब्बल 8 राज्यात...
Rain
| Updated on: Jan 28, 2026 | 7:14 AM

राज्यातील हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. कधी गारठा तर कधी पाऊस अशी स्थिती निर्माण झाली. डिसेंबर महिन्यात थंडी अधिक प्रमाणात होती. मात्र, जानेवारी महिन्यात हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. राज्यातील काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली. काल अनेक भागात अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला. यामुळे तापमानात चढउतार बघायला मिळाला. मुंबईसह काही भागात गारठा वाढला. राज्यात जरी हवामानात चढउतार बघायला मिळत असला तरीही उत्तरेकडील राज्यात सध्या कडाक्याची थंडी असून हिमवृष्टी सुरू आहे. तापमानात सतत घसरण होतंय. यासोबतच राज्यातील अनेक शहरांमध्ये वायू प्रदूषणात मोठी वाढ झाली. वायू प्रदूषणामुळे लोकांना श्वसनाच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. श्वास घेण्यासही त्रास होत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा जारी केला.

आज राज्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून काही भागात पाऊसही होऊ शकतो. यासोबतच दिवसभरात तापमानात चढउतार राहिल. राजस्थानच्या अलवार येथे देशातील नीचांकी तापमानाची नोंद झाली असून अलवार येथे 4.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. धुळे येथे 10.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. भारतातील अनेक भागात आज पावसाचा इशारा देण्यात आला.

भारतीय हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी देशातील आठ राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश, सिक्कीम,छत्तीसगड, उत्तराखंड या आठ राज्यांमध्ये पावसाची इशारा जारी केला आहे. फक्त पाऊसच नाही तर पावसासोबतच वारेही असेल.

या आठही राज्यात 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वादळ येण्याची शक्यता आहे. 28 जानेवारी रोजी उत्तराखंडमध्ये गडगडाटी वादळ, विजांचा कडकडाटसह 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानंतर लोकांचे टेन्शन चांगले वाढले आहे. मध्येच थंडी तर आता थेट पावासाचा मोठा इशारा देण्यात आला. अनेक भागात अवकाळी पावसाचे आगमन होणार असल्याने शेतकरी चिंतेत आहे. काही महिन्यांपूर्वीच राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता.