वातावरणात मोठा बदल, अलर्ट जारी, राज्यात ढगाळ वातावरणासह…

Maharashtra Weather Update : राज्यात हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच आज भारतीय हवामान विभागाने मोठा अंदाज वर्तवला आहे. तब्बल पाच राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला.

वातावरणात मोठा बदल, अलर्ट जारी, राज्यात ढगाळ वातावरणासह...
Maharashtra Weather
| Updated on: Jan 30, 2026 | 7:29 AM

राज्यातील हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. कधी थंडी तर कधी पाऊस अशी स्थिती आहे. सध्या उत्तरेकडे कडाक्याची थंडी वाढली असून पारा घसरताना दिसत आहे. डिसेंबर महिन्यापेक्षा अधिक जानेवारी महिन्यात राज्यात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता होती. मात्र, जानेवारी महिन्यात तापमानात वाढ झाली. वर्षाच्या पहिल्याच दिवशी अनेक भागात मुसळधार पाऊस झाला आणि त्यानंतर थंडी गायब झाली. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. उत्तरेकडे गारठा वाढला असल्याने राज्यातही थंडी वाढण्याचा अंदाज होता. मात्र, राज्यात येणाऱ्या शीतलहरी कमी असल्याने त्या तुलनेत थंडी नाही. थंडी जरी कमी अधिक होत असली तरीही राज्यात वायू प्रदूषण मोठा मुद्दा बनले असून मुंबईमध्ये सातत्याने वायू प्रदूषणात वाढ होत आहे. ज्यामुळे श्वसनाशी संबंधित अनेक समस्या वाढल्या आहेत.

हरियाणाच्या नर्नुल येथे देशातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. नर्नुल येथे 2.0 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. धुळे येथे राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. धुळ्यात 10 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. राज्यात आजही अनेक भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. 3 ते 4 अंशांने तापमानात वाढ होऊ शकते. अनेक भागात सकाळच्यावेळी धुके आणि दव पडू शकतात.

दुसरीकडे भारतीय हवामान विभागाने देशातील तब्बल 5 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला. यादरम्यान 40 ते 45 मैल प्रतितास वेगाने वारेही वाहण्याचा अंदाज आहे. हिमाचल प्रदेश, राजस्थान, जम्मू आणि काश्मीर, पंजाब, लडाख या राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला. पंजाबमधील बहुतेक जिल्ह्यांमध्ये दाट धुक्याचा इशारा देण्यात आला आहे.

देशातील हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. ऐन दिवाळीमध्येही अनेक राज्यात पाऊस झाला. त्यामध्येच आता पाच राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. दिल्लीमध्ये सध्या कडाक्याची थंडी बघायला मिळत आहे. राज्यात पुढील काही दिवसांमध्ये तापमानात सातत्याने चढउतार बघायला मिळेल. कधी थंडी तर कधी गरमी अशी स्थिती असणार आहे.