Maharashtra Weather Update : राज्यातील 23 जिल्ह्यांमध्ये पावसाचा मोठा इशारा, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, 24 तासात..
Maharashtra Weather Update : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला आहे. पावसाला सुरूवात देखील झाली. वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे.

राज्यातील हवामानात सतत बदल होत आहे. जुलै महिन्याच्या सुरूवातीला राज्यात सर्वदूर चांगला पाऊस झाला. रखडलेल्या पेरण्या शेतकऱ्यांनी केल्या. मात्र, त्यानंतर पुन्हा एकदा पावसाने पाठ फिरवल्याचे बघायला मिळाले. गेल्या काही दिवसांपासून पावसाची वाट बघितली जात आहे. त्यातच आता पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकाडाटासह जोरदार पाऊस हजेरी लावले. नाशिक, घाटमाथा पुणे, सातारा याठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे, सातारा, अहिल्यानगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, बीड, नांदेड, हिंगोली, सोलापूर, लातूर, अमरावती, धाराशिव, गडचिरोली, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गोदिंया, वाशिम, नागपूर, वर्धा, अकोला या जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. भारतीय हवामान विभागाने या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी केला.
अहिल्यानगर, परभणी, हिंगोली, बीड, पुणे, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा वादळी वाऱ्यासह पाऊस होईल. अनेक जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा इशारा देण्यात आला. सकाळपासून ढगाळ वातावरण असून रात्री अनेक भागात पाऊस झाला. वाशिमच्या मालेगाव आणि मंगरूळपीर कारंजा तालुक्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस तर जिल्ह्यातील काही ठिकाणी रिमझिम पाऊस बरसला.
गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. खरीप पिकांना नवसंजीवनी मिळाली. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहिल्यास पिकांच्या वाढीस मोठी मदत होणार आहे. ज्यामुळे शेतकरी राजांची चिंता मिटली आहे.
परभणीत दहा दिवसाच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर अखेर पावसाला सुरूवात झाली. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानंतर जिल्ह्यातील अनेक भागात पावसाला सुरुवात झाली. शेतकऱ्यांवरील तूर्तास दुबार पेरणीच संकट टळल आहे. 20 जुलैपासून राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामध्येच आता पावसाला सुरूवात झाली. ज्यामुळे शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचे संकट टळणार असल्याचे स्पष्ट आहे. पुढील काही दिवसात पावसाचा जोर वाढेल.