मॉन्सून महाराष्ट्रात दाखल होताच भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा, पुढील 24 तासात..

Today Weather Live : भारतीय हवामान विभागाने नुकताच अत्यंत मोठा इशारा दिला. मॉन्सून महाराष्ट्रात दाखल झाला. आज काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस हजेरी लावणार आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील 24 तासांकरिता अलर्ट जारी केला.

मॉन्सून महाराष्ट्रात दाखल होताच भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा, पुढील 24 तासात..
Monsoon Maharashtra
| Updated on: Jun 07, 2026 | 7:35 AM

मॉन्सून अखेर महाराष्ट्रात दाखल झाला. केरळमध्ये दोन दिवसांनी उशिरा दाखल झाल्यानंतर मॉन्सून आता हळूहळू पुढे सरकत आहे. मॉन्सूनने गोवा, तळ कोकणापर्यंत मजल मारली आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडूच्या बहुतांश भागात मॉन्सून पोहोचला. मॉन्सूनच्या पुढील वाटचालीकरिता हवामान पोषक असल्याचे कळतंय. पुण्यात पुढील चार ते पाच दिवस पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. येलो अलर्ट जारी करण्यात आला. सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात जोरदार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला. मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाने हजेरी लावली. राज्यात आजही पावसाचे ढग कायम आहेत. यंदा राज्यात पाऊस चांगला राहण्याचा अंदाज आहे. देशातील इतर राज्यातही जोरदार पाऊस पडताना दिसत आहे.

अकोला जिल्ह्यातील नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने जिल्ह्यासाठी पुढील ‘येलो अलर्ट’ जारी केला असून 7 जून ते 9 जून दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार अकोला जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.

चिपळूणमध्ये अचानक जोरदार पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. दिवसभराच्या उकाड्यानंतर वातावरणात अचानक बदल झाला. उष्णतेने त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. भारतीय हवामान विभागाने परभणी जिल्ह्यात पावसाचा इशारा दिला होता.

अचानक झालेल्या वादळी वाऱ्यामुळे परभणी ते पूर्णा जाणाऱ्या महामार्गावर झाडे कोसळल्याने वाहतूक ठप्प. भारतीय हवामान विभागाच्या ताज्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत मान्सून वेगाने पुढे सरकेल आणि अनेक राज्यांमध्ये पसरेल. अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत हवामान प्रणाली सक्रिय झाल्या आहेत. भारतीय हवामान विभागाने 19 राज्यांमध्ये मोठा अलर्ट जारी केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us