AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Weather Update : राज्यात धो धो पाऊस, मोठा अलर्ट जारी, राज्यात तब्बल 4 दिवस पावसाचा..

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली. त्यातच आता भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. राज्यात राज्यात पुन्हा एकदा पाऊस येण्याचा अंदाज आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाची वाट शेतकरी बघत आहेत.

Maharashtra Weather Update : राज्यात धो धो पाऊस, मोठा अलर्ट जारी, राज्यात तब्बल 4 दिवस पावसाचा..
Maharashtra Weather
| Updated on: Sep 11, 2026 | 1:15 PM
Share

राज्यात ऑगस्ट महिन्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. पावसाने पाठ फिरवल्याचे बघायला मिळाले. सप्टेंबरमध्येही सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. शेतकरी राजा चिंतेत आहे. पिके संकटात आहेत. त्यातच हवामान विभागाने मोठा इशारा दिला. महाराष्ट्रात मान्सूनचा परतीचा प्रवास अद्याप सुरू झालेला नाही. पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने इशारा दिला होता की, दोन ते तीन दिवस पाऊस नसेल. त्यानंतर आता पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला. हवामान विभागाने 11 ते 14 सप्टेंबरदरम्यान विविध जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. 15 सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, नाशिक, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याचा अंदाज आहे.

काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामानाचा अंदाज पाहून प्रवासाचे नियोजन करावे. मान्सूनचा मुक्काम लांबण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्रातील पावसाची स्थिती पुढील काही दिवस महत्त्वाची ठरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली आहे. त्यातच पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला.

पाऊस समाधानकारक कोसळत नसल्याने स्थिती गंभीर आहे. काही भागात स्थिती गंभीर आहे. दुष्काळाचे मोठे संकट राज्यातील अनेक भागांमध्ये आहे. अनेक धरणे कोरडी पडली आहेत. जर पाऊस झाला नाही तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. मराठवाड्यातील अनेक नेत्यांनी दुष्काळ जाहीर करावा, असे पत्र शासनाकडे दिली आहेत. मराठवाडा आणि विदर्भात स्थिती गंभीर आहे.

बुलढाणा जिल्ह्यात मागील चाळीस दिवसांपेक्षा जास्त काळापासून पाऊस नाही. परिणामी सोयाबीन पिक वाळले . सोबतच इतर पीक ही वाळली. शेतकरी पावसाची वाट पाहतोय, मात्र पाऊस येत नाही. दररोज पावसाची वाट पाहत असतो. मात्र, पीक वाळली तरीही पाऊस आला नाही. खरीप हंगाम गेला आणि पुढचे पण काही खर नाही. मराठवाडा आणि विदर्भात पावसाने पाठ फिरवली.

Follow Us
नितेश राणेंच्या पुढाकाराने मोदी एक्सप्रेस मुंबईहून कोकणाकडे रवाना
Mumbai Modi Express | गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा! नितेश राणेंच्या पुढाकाराने मोदी एक्सप्रेस मुंबईहून कोकणाकडे रवाना
जरांगेंना हात लावण्याचा प्रयत्न केला तर... दीपकेंचा सरकारला थेट इशारा
Abhijeet Dipke | जरांगेंना हात लावण्याचा प्रयत्न केला तर... अभिजीत दीपकेंचा सरकारला थेट इशारा
वर्तमान पत्रात वाचलंय मी... छगन भुजबळ यांनी बड्या नेत्याचं नाव घेत...
वर्तमान पत्रात वाचलंय मी... छगन भुजबळ यांनी बड्या नेत्याचं नाव घेत नेमकं काय सांगितलं?
BRICS परिषदेसाठी दिल्ली सज्ज, पुतिन जिनपिंग मोदींच्या भेटीकडे लक्ष
BRICS परिषदेसाठी दिल्लीत मोठ्या हालचाली, पुतिन जिनपिंग आणि PM मोदींच्या भेटीकडे लक्ष
जरांगेंच्या उपोषणावर दीपकेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, सरकारला फरक पडणार
जरांगेंच्या उपोषणावर दीपकेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, सरकारला फरक पडणार नाही, आता...
नागपूरच्या ऐतिहासिक मारबत उत्सवाला सुरुवात, काळी पिवळी मारबत मिरवणुक..
नागपूरच्या ऐतिहासिक मारबत उत्सवाला सुरुवात, काळी पिवळी मारबत मिरवणुकीत
शारीरिक व्याधी बऱ्या करण्याचे आमिष दाखवून...
सोशल मीडियावरील रील्स पाहून संपर्क, ‘उतारे-विधी’च्या नावाखाली... पुण्यातील महिला भोंदूचा कारनामा
सावेंच्या भाऊ आणि पुतण्याला मारहाण करण्याच्या अगदीपूर्वीचा व्हिडिओ...
Atul Save Brother Marhan Case | सावेंच्या भाऊ आणि पुतण्याला मारहाण करण्याच्या अगदीपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र गीत सुरू झाले तरी ठाकरे बंधू बसलेलेच, बड्या नेत्याचा आरोप
महाराष्ट्र गीत सुरू झाले तरी ठाकरे बंधू बसलेलेच, व्हिडीओ शेअर करत बड्या नेत्याचा आरोप
मनोज जरांगेंची ED चौकशी करणार? आंदोलनादरम्यान अवैध...
मनोज जरांगेंची ED चौकशी करणार? आंदोलनादरम्यान अवैध... बड्या नेत्याच्या आरोपाने खळबळ