Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील या 13 जिल्ह्यांमध्ये कोसळणार धो धो पाऊस, मोठा इशारा, थेट 24 तासात..

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा एकदा हवामानात मोठा बदल झाला. आज पावसाचा मोठा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला. विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील या 13 जिल्ह्यांमध्ये कोसळणार धो धो पाऊस, मोठा इशारा, थेट 24 तासात..
Maharashtra Weather
| Updated on: Jul 16, 2026 | 7:23 AM

राज्यातील हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. राज्यात सध्या पावसाला पोषक वातावरण आहे. आज काही भागात पावसाचा इशारा देण्यात आला. 20 जुलैपासून राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरूवात होईल. यादरम्यानच भारतीय हवामान विभागाने कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राता विजांच्या कडकाडाटासह पावसाचा इशारा दिला आहे. देहरादू, पटना, बंकुरा या भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशात समुद्र सपाटीपासून 900 किलो मीटर अंतरावर चक्राकार वारे आहे. आज पावसाचा येलो अलर्ट सोलापूर, कोकणातील काही भाग आणि धाराशिव येथे जारी करण्यात आला. या पावसामुळे पिकांना दिला नक्की मिळणार आहे. शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. अफगाणिस्तानच्या दिशेने येणाऱ्या वाऱ्यामुळे मॉन्सूनला अडथळा निर्माण झाला.

20 जुलैपासून पुन्हा एकदा राज्यात पाऊस धुमाकूळ घालेल. नाशिक, पुणे, अहिल्यानगर, रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, मुंबई, सांगली, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर आणि बीड या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. कालही काही भागात पाऊस झाला. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने आजही पावसाचा मोठा इशारा दिला.

मुंबई, ठाणे आणि पालघर भागात काल पावसाने हजेरी लावली. ज्यामुळे वातावरणातील उकाडा कमी झाला. मुंबई शहरात आणि उपनगरात जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली होती. मुंबईत जुलैच्या सरासरीहून अधिक पाऊस नोंदवला गेला. जून महिन्यात पावसाने दांडी मारली होती, त्याची भर चार ते पाच दिवसांमध्येच भरून निघाली.

मागील काही दिवसांपासून पावसाने मुंबईसह उत्तर कोकण प्रदेशात विश्रांती घेतली. आता पुन्हा पाऊस कोसळताना दिसत आहे. त्यामध्येच आज भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला. पुढील काही दिवस पाऊस कायम असेल. हवामान तज्ज्ञांच्या मते अफगाणिस्तानातून येणाऱ्या हवेचा दोन ते तीन दिवसात प्रभाव कमी होईल. त्यानंतर देशात पुन्हा एकदा मॉन्सून सक्रिय होईल. जुलै महिन्याच्या सुरूवातीला राज्यात धो धो पाऊस झाला.

Follow Us