राज्यावर संकट! अवकाळी पावसाचा थेट इशारा, ढगाळ वातावरणासह…

Maharashtra Weather Update : भारतीय हवामान विभागाने नुकताच मोठा इशारा दिलाय. हवामानात मोठा बदल होताना दिसेल. आज ढगाळ तावावरणासह काही भागात पावसाचा अंदाज आहे.

राज्यावर संकट! अवकाळी पावसाचा थेट इशारा, ढगाळ वातावरणासह...
Rain
| Updated on: Jan 31, 2026 | 7:30 AM

राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठ्या प्रमाणात चढउतार बघायला मिळतोय. कधी थंडी, पाऊस तर उकाडा अशी स्थिती आहे. नोव्हेंबर महिन्यापर्यंत राज्यात पाऊस होता. डिसेंबरमध्ये थंडी दाखल झाली आणि जानेवारी महिन्यात तापमानात बदल होत आहे. सुरूवातीला सांगितले गेले की, डिसेंबर महिन्याप्रमाणेच जानेवारीतही राज्यात थंडी कायम राहिल. मात्र, जानेवारी महिना संपत आला असून तापमानात चढउतार बघायला मिळतोय. सध्या परिस्थितीला उत्तरेकडे कडाक्याची थंडी आहे. मात्र, त्या तुलनेत राज्यात थंडी नाही. उत्तरेकडे थंडी वाढली की, राज्यातही थंडी असते. पण यावेळी चित्र काही वेगळे बघायला मिळतंय. पंजाब, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, जम्मू काश्मीर या भागात पावसाचा इशारा देण्यात आला. शिवाय कडाक्याची थंडीही तिकडे आहे. राज्यातील वातावरणात गेल्या पंधरा दिवसांपासून मोठा बदल दिसतोय.

राज्यात सध्या पावसाला पोषक वातावरण आहे. यासोबतच आज काही भागात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. अनेक भागात आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. धुळ्यात राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. धुळ्यात 8.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. आज दिवसभर ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. सततच्या वातावरणातील बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. यामुळे आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारीपर्यंत लडाख, जम्मू काश्मीर या भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्ये मोठ्या वादळाची शक्यता आहे. दिल्लीमध्ये पुढील काही तासात मुसळधार पावसाची शक्यता आहे. सध्या दिल्लीतील तावावरण हा मोठा चिंतेचा विषय बनला.

राजस्थानातील अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. जयपूर हवामान विभागाने 31 जानेवारी रोजी पाऊस पडेल असा अहवाल दिला आहे. दुसरीकडे राज्यातही आज काही भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. मुंबईतील वायू प्रदूषण मोठा चिंतेचा विषय बनला आहे. मुंबईत वायू प्रदूषण वाढले असून प्रशासनाकडून प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न केली जात आहेत. मात्र, प्रदूषण काही कमी होत नाही.