सीमेवर तणाव, पण मुंबईत हायअलर्ट, पुन्हा 26/11… नेमका निर्णय काय?

गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढलेला आहे. सध्या दोन्ही देशांत शस्त्रसंधी झालेली असली तरी परिस्थिती पूर्णपणे निवळलेली आहे. त्यामुळेच खबरदारी म्हणून संपूर्ण देशातील सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर आहे.

सीमेवर तणाव, पण मुंबईत हायअलर्ट, पुन्हा 26/11... नेमका निर्णय काय?
mumbai on high alert
| Updated on: May 11, 2025 | 4:02 PM

India Pakistan War : गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढलेला आहे. सध्या दोन्ही देशांत शस्त्रसंधी झालेली असली तरी परिस्थिती पूर्णपणे निवळलेली आहे. त्यामुळेच खबरदारी म्हणून संपूर्ण देशातील सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर आहे. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारतीय सैन्य, स्थानिक पोलीस दक्ष आहेत. मुंबई हे शहर भारताच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. त्यामुळेच मुंबईलाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईत अत्यंत कडक सुरक्षेची तयारी

मुंबईत 26/11 ची धडकी भरवणारी घटना पुन्हा घडू नये यासाठी भारतीय नौदल, मुंबई पोलीस आणि अन्य सुरक्षा यंत्रणा समुद्रमार्गांवर कडेकोट गस्त घालत आहेत. मुंबईत 26/11 चा जीवघेणा हल्ला अजूनही नागरिकांच्या स्मरणात आहे. त्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी, सध्या भारत-पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत अत्यंत कडक सुरक्षेची तयारी करण्यात आली आहे. भारतीय नौदलाने समुद्र आणि हवाई मार्गांनी होणाऱ्या संभाव्य घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा आदेश दिला आहे.

कोणतीही संशयास्पद हालचाल रोखण्याचा प्रयत्न

अरबी समुद्र आणि मुंबईच्या किनारपट्टीवर नौदलाचे उत्तर आणि पश्चिम ताफे तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय, मच्छीमारांच्या नौका आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यांच्या हालचाली, ओळखीची पडताळणी आणि गस्तीच्या माध्यमातून कोणतीही संशयास्पद हालचाल रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुंबई पोलीस, तटरक्षक दल आणि नौदल संयुक्तरित्या समुद्रात गस्त घालत आहेत. गेट वे ऑफ इंडिया, बंदर परिसर आणि समुद्रमार्गे येणाऱ्या पर्यटकांवरही अधिक लक्ष दिलं जात आहे. प्रवेशद्वारांवर तपासणी वाढवण्यात आली आहे.

सध्या भारत पाकिस्तानातील परिस्थिती कशी आहे?

दरम्यान, सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्याच शस्त्रसंधीचा करार झाला आहे. या करारानुसार दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले न करण्याचे ठरवले आहे. मात्र हा करार झाल्यानंतर पुढच्याच काही तासांत पाकिस्तानने जम्मू, राजस्थान, पंजाब या सीमाभागातील राज्यांत हल्ले केले. त्यानंतर भारताने आक्रमक पवित्रा घेत भारताला तंबी दिली होती. शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याचे हे प्रकरण गंभीर असून पाकिस्तानने याबाबत विचार केला पाहिजे, असे भारताने पाकिस्तानला सांगितले होते. येत्या 12 मे रोजी भारत आणि पाकिस्तानचे डीजीएमओ यांच्यात चर्चा होणार आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.