AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर महागाईचा प्रश्न सुटला, सरकारने बाजारात आणली स्वस्त उत्पादने, कुठे आणि कशी खरेदी कराल?

भारत सरकारने महागाईवर मात करण्यासाठी "भारत ब्रँड" नावाचा उपक्रम सुरू केला आहे. यातून शेतकऱ्यांकडून थेट पीठ, तांदूळ आणि कांदा खरेदी केले जात असल्याने, मधल्या दलालांचा खर्च कमी होतो आणि ग्राहकांना स्वस्त किमतीत ही वस्तू मिळतात.

अखेर महागाईचा प्रश्न सुटला, सरकारने बाजारात आणली स्वस्त उत्पादने, कुठे आणि कशी खरेदी कराल?
| Updated on: Sep 04, 2025 | 9:15 PM
Share

सध्याची वाढलेली महागाई हा प्रत्येक कुटुंबासाठी एक मोठा प्रश्न बनला आहे. भाजीपाला, किराणा, आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. अशा परिस्थितीत, सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने भारत नावाचा एक खास ब्रँड सुरु केला आहे. या माध्यमातून स्वस्त दरात पीठ, तांदूळ आणि कांदा मिळणार आहे. आता हा भारत ब्रँड म्हणजे नक्की काय, याचा तुम्हाला कसा फायदा होईल, हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.

भारत ब्रँड नक्की आहे तरी काय?

भारत ब्रँड हा केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाचा एक खास उपक्रम आहे. या योजनेत सरकार थेट शेतकऱ्यांकडून चांगल्या दर्जाचे धान्य आणि कांदा खरेदी करते. त्यामुळे, मधल्या दलालांचा खर्च वाचतो. ही सर्व उत्पादने कमी किंमतीत उपलब्ध होतात. म्हणजे समजा जर बाजारात गव्हाचे पीठ साधारणपणे ४० रुपये किंवा त्याहून अधिक दराने मिळत असेल, तर तेच भारत ब्रँडचे पीठ फक्त ३१.५० रुपये प्रति किलो मिळेल. त्याचप्रमाणे, तांदळाचा दर फक्त ३४ प्रति किलो निश्चित करण्यात आला आहे. यामुळे, तुमच्या महिन्याच्या किराणा खर्चात मोठी बचत होईल.

थेट तुमच्या घराजवळ पोहोचणार

विशेष बाब म्हणजे हे सामान खरेदी करण्यासाठी तुम्हाला रेशनच्या दुकानांमध्ये रांगेत उभे राहण्याची गरज नाही. सरकार आता फिरत्या वाहनांद्वारे (मोबाईल व्हॅन) हे सामान थेट तुमच्या घराजवळ पोहोचवेल. फक्त व्हॅनवरच नाही, तर ही उत्पादने आता रिलायन्स रिटेल, डी-मार्ट आणि ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध होतील. यामुळे खरेदी करणे आणखी सोपे होईल.

लाखो कुटुंबांना होणार फायदा

महाराष्ट्राचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी आज या योजनेचा शुभारंभ केला. सणासुदीच्या दिवसांत हे स्वस्त सामान बाजारात आल्याने इतर दुकानदारही आपोआप आपल्या वस्तूंचे भाव कमी करतील. यामुळे महागाई कमी होण्यास नक्कीच मदत होईल. हा उपक्रम म्हणजे सरकारने महागाई कमी करण्यासाठी उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे, ज्याचा फायदा लाखो कुटुंबांना मिळेल.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.