थंडीच्या लाटेसह अवकाळी पावसाचा इशारा, अलर्ट जारी, पुढील 24 तास…

Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडी वाढली आहे. नुकताच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा जारी केला. राज्यात पुढील काही दिवस थंडी कायम राहणार आहे.

थंडीच्या लाटेसह अवकाळी पावसाचा इशारा, अलर्ट जारी, पुढील 24 तास...
Rain
| Updated on: Jan 05, 2026 | 7:37 AM

हवामानातील सततच्या बदलामुळे आरोग्याच्या असंख्य समस्या निर्माण होत आहेत. मुंबईत प्रचंड प्रदूषण वाढले असून श्वास घेणेही घातक बनले. सायंकाळच्यावेळी विशेष: मुंबईतील प्रदूषणात वाढ होत आहे. महापालिकेकडून प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न केली जात असल्याचा दावा केला जातोय. मात्र, प्रत्यक्षात प्रदूषण वाढतच चाललंय. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात पुढील काही दिवस थंडी कायम राहणार असून थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. उत्तरेकडे थंडीचा अलर्ट दिला असून पारा कमी होतोय. यामुळे राज्यातही शीत लहरी दाखल होत आहेत.
धुळ्यात राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. धुळ्यात 9.3 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.

भंडारा येथे 10 अंश तापमानाची नोंदले गेले. राज्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असल्याने भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे. ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज असल्याने गारठाही राहिल. राज्यातील किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण असल्याने तापमानात चढउतार बघायला मिळेल. काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस येण्याचीही शक्यता काही भागात आहे.

उत्तर प्रदेशचे लोक पुन्हा एकदा दाट धुके आणि कडाक्याच्या थंडीच्या दुहेरी संकटाचा सामना करत आहेत. विविध जिल्ह्यांमध्ये दाट धुके आहे. दिवसभर थंडीही कायम राहण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश, बिहार, हिमाचल प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि राजस्थान भागात थंडीची वाढताना दिसत आहे. एकीकडे थंडी तर दुसरीकडे पाऊस अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. उत्तरेकडे प्रचंड थंडी असून केरळ, तामिळनाडूमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला.

राज्यात संपूर्ण डिसेंबर महिना थंडी कायम राहिली. मात्र, वर्षाच्या पहिल्याच दिवशी जोरदार पाऊस झाला. अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने लोकांची चांगलीच तारांबळ उडाली. संपूर्ण जानेवारी महिन्यातही थंडी कायम राहणार असल्याचे सांगितले जाते. मुळात म्हणजे यंदा देशातच थंडी उशीरा दाखल झाली. नोव्हेंबर महिन्यातपर्यंत पाऊसच सुरू होता. त्यानंतर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून गारठा जाणू लागला. त्यामध्येच सध्या वातावरणात सातत्याने बदल होतोय.