
राज्यासह देशात वातावरणात मोठा बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस, थंडी तर मध्येच उकाडा अशी स्थिती आहे. उत्तरेकडे कडाक्याची थंडी आहे. मात्र, असे असतानाही राज्यात म्हणावा तेवढा गारठा नक्कीच नाहीये. सकाळी आणि संध्याकाळी थोडी थंडी जाणवत आहे, दुपारी उकाडा जाणवतो. वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुसळधार पाऊस राज्यात झाला आणि तेव्हापासून थंडी गायब झाली. जानेवारी महिन्याच्या तुलनेत डिसेंबर महिन्यात थंडी जास्त होती. जानेवारी महिन्यातही थंडी कायम राहण्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज होता. मात्र, प्रत्यक्षात उलट झाले आणि उकाडा जाणवत आहेत. दुसरीकडे सध्या राज्यातील काही शहरात प्रचंड वायू प्रदूषण वाढल्याचे बघायला मिळत आहे. कडाक्याची थंडी पडली. पुढील काही दिवसात राज्यातील तापमानात मोठे बदल होण्याचे संकेत आहेत. यामुळे आरोग्याच्या काही समस्या जाणू शकतात.
पुण्यात पुढील दोन दिवस हवामान स्थिर राहण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील किमान आणि कमाल तापमानात मोठी वाढ झाली. त्यामुळे शहरात उन्हाचा चटका वाढला होता. मात्र, सोमवारी तापमान लक्षणेरीत्या घट झाली आहे परिणामी गारठा आवडला असून पुढील दोन दिवस हवामान स्थिर राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
राज्यातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद निफाडमध्ये झाली. 7.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद निफाडमध्ये झाली. गोदिंयात 9.8 अंश सेल्सिअस तापमान होते. राज्यात गारठा कमी होण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक भागात आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या निफाड, गोदिंया आणि धुळ्यात गारठा कायम राहण्याची शक्यता आहे.
देशातील अनेक भागात थंडी कमी जास्त होताना दिसत आहे. मात्र, नुकताच भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानंतर टेन्शन वाढल्याचे बघायला मिळत आहे. देशातील काही भागात पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला. रिमझिम पावसासब मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. कधी, थंडी तर कधी पाऊस अशी स्थिती देशात आहे. दिल्लीमध्ये प्रदूषणात वाढ होण्याचा अंदाज आहे.